गीतेतील तत्वज्ञान आचरणात आणावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:27 AM2020-12-30T04:27:42+5:302020-12-30T04:27:42+5:30

संगमनेर पुरोहित संघाने सामुहिक गीता पठण व प्रा. दिवेकर यांचे ‘श्रीमद्भगवतगीता एक परिचय’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. ...

The philosophy in the song should be put into practice | गीतेतील तत्वज्ञान आचरणात आणावे

गीतेतील तत्वज्ञान आचरणात आणावे

संगमनेर पुरोहित संघाने सामुहिक गीता पठण व प्रा. दिवेकर यांचे ‘श्रीमद्भगवतगीता एक परिचय’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. ह. भ. प. प्रा सतिश देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी निवडक अध्यायांचे पठण केले. गीतेचे वक्ते व श्रोते कोण होते. गीतेची रचना कशी आहे. गीता पठणाच्या विविध पद्धती कोणत्या. भगवान श्रीकृष्ण व वीर अर्जुन यांचे नाते कसे होते. खांडववन जळताना नेमके काय घडून आले. विविध व्यक्तिमत्त्वांवर गीतेचा काय प्रभाव पडला. आदी मुद्यांवर त्यांनी आपले विचार मांडून आजच्या धकाधकीच्या व मानसिक ताणतणावाच्या वातावरणात गीतेचा संदेश कसा महत्वाचा आहे व आजही जीवन संग्राम लढताना गीतेची उपयुक्तता विषद केली. भगवद्गीता जगायचे कसे हे शिकवते तर श्रीमद् भागवत हसत हसत मरणाला सामोरे कसे जायचे हे शिकवतो. हे सांगून गीता सकारात्मक विचार शिकवते. पुरोहित संघाचे पदाधिकारी संदिप वैद्य यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व वक्त्यांचा परिचय करुन दिला. कार्यक्रम आयोजित करण्यात पुरोहित संघाचे अध्यक्ष नरेंद्र उर्फ भाऊ जाखडी व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.

Web Title: The philosophy in the song should be put into practice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.