वडिलांच्या उपचारासाठी धावणाऱ्या मुलींचे फिरोदियांनी घेतले पालकत्व
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 05:50 AM2022-01-19T05:50:06+5:302022-01-19T05:50:18+5:30
उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या पाठबळामुळे भंडारी भगिनींच्या जिद्दीला मोठे बळ
अहमदनगर : धावण्याच्या विविध स्पर्धेत भाग घेऊन मिळविलेल्या बक्षिसांच्या रकमेतून वडिलांचा उपचार करणाऱ्या अळकुटी येथील भंडारी भगिनींचे संपूर्ण पालकत्व येथील शांतिकुमार फिरोदिया मेमोरिअल फौंडेशनने स्वीकारले आहे.
याशिवाय वडिलांवर उपचार करण्याची जबाबदारीही घेतली आहे. उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या या पाठबळामुळे भंडारी भगिनींच्या जिद्दीला मोठे बळ मिळाले आहे. त्यामुळे शीतल, साक्षी आणि भाग्यश्री भंडारी या भगिनी आता आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतच्या कोणत्याही स्पर्धेत सहभाग घेऊ शकणार आहेत. ‘लोकमत’मध्ये त्यांच्या जिद्दीची कैफियत मांडली होती.
आमच्यावरील मोठा ताण हलका झाला आहे. आता आम्ही खेळाकडे निश्चितच लक्ष केंद्रित करू. तसेच ऑलिम्पिकमध्ये नक्कीच सुवर्णपदक मिळवू. हेच आमचे ध्येय आहे.
- शीतल, भाग्यश्री भंडारी, धावपटू
‘क्षमता असेल तर जिंकणारच’ हे ध्यानात घेऊन मुलींनी मेहनत करावी. आता त्यांना कोणताही ताण-तणाव घेण्याची गरज नाही. त्यांच्या वडिलांचा संपूर्ण उपचार करण्याची जबाबदारी मी स्वत: घेतली आहे.
- नरेंद्र फिरोदिया, उद्योजक