फोटो स्टुडिओचा अत्यावश्यक सेवेत समावेश करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:19 AM2021-04-16T04:19:36+5:302021-04-16T04:19:36+5:30

कोपरगाव : कोरोनामुळे महाराष्ट्रात ब्रेक द चैन मिशन सुरु आहे. या मिशनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व अस्थापना बंद ...

Photo studios should be included in the essential services | फोटो स्टुडिओचा अत्यावश्यक सेवेत समावेश करावा

फोटो स्टुडिओचा अत्यावश्यक सेवेत समावेश करावा

कोपरगाव : कोरोनामुळे महाराष्ट्रात ब्रेक द चैन मिशन सुरु आहे. या मिशनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व अस्थापना बंद ठेवण्यात आल्या आहे. फोटो स्टुडिओ हा व्यवसाय देखील अत्यावश्यक सेवांशी निगडीतच आहे. त्यामुळे या व्यवसायाचा देखील अत्यावश्यक सेवेत समावेश करावा अशी मागणी कोपरगाव येथील प्रेस फोटोग्राफर तथा फोटो स्टुडिओ चालक संजय भवर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गुरुवारी (दि. १५) ईमेलद्वारे निवेदन पाठवून केली आहे.

भवर म्हणाले, अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या विविध विभागात सेवा देणाऱ्या व्यक्तींना शासनाने या काळात ओळखपत्र असणे बंधनकारक केले आहे. यातील अनेक व्यक्तींकडे फोटोच नसल्याने त्यांना ओळखपत्र काढण्यासाठी अडचण होत आहे. शेतीसाठी आवश्यक असणारे उद्योग व सरकारी कार्यालये सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. परंतु, शेतकऱ्यांना सरकार दप्तरी कागदपत्र सादर करताना आवश्यक ते फोटो सादर करावे लागतात. तेही मिळत नाहीत. बांधकाम मजुरांना आर्थिक मदत जाहीर केली आहे, ती बँकेतून काढण्यासाठी बँक पासबुकांवर फोटोची गरज पडणार आहे. या काळात दशक्रियाविधी, वाहन परवाना आदी साठी देखील फोटो आवश्यक असतो. परंतु, फोटो स्टुडिओ बंद असल्याने नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

--

Web Title: Photo studios should be included in the essential services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.