निळवंडेच्या खोदलेल्या कालव्यात पीक अप कोसळली; तीन जण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 11:24 AM2020-06-28T11:24:33+5:302020-06-28T11:25:03+5:30
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा शिवारात निळवंडे धरणाच्या कालव्यासाठी खोदलेल्या मोठ्या खड्ड्यात वाळू वाहतूक करणारे पीक वाहन कोसळून झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले आहेत.
संगमनेर : तालुक्यातील हिवरगाव पावसा शिवारात निळवंडे धरणाच्या कालव्यासाठी खोदलेल्या मोठ्या खड्ड्यात वाळू वाहतूक करणारे पीक वाहन कोसळून झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले आहेत. हा अपघात रविवारी (२८ जून) सकाळी घडला.
या अपघाताबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी माहिती देताना सांगितले, प्रवरा नदीच्या पात्रातून वाळूचा अवैधरित्या उपसा करून चारचाकी वाहनातून वाळू वाहतूक सुरू होती. हे वाहन हिवरगाव पावसा शिवारात निळवंडे धरणाच्या कालव्यासाठी खोदलेल्या मोठ्या खड्ड्यात जाऊन पडल्याने वाहन चालकासह तीन जण जागीच ठार झाले.
मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. शवविच्छेदनासाठी मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे.