विहिरीत पडलेला बिबट्या पिंज-यात जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 06:00 PM2019-09-11T18:00:01+5:302019-09-11T18:00:53+5:30
रांधे येथील पावडे वस्तीवर एका विहिरीत मंगळवारी रात्री (दि.१०) भक्ष्याच्या शोधात असताना बिबट्या पडला होता. ही बाब बुधवारी सकाळी शेतकरी दगडू पावडे यांच्या लक्षात आली. त्यानंतर वनखात्याच्या कर्मचा-यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन बिबट्याला सुखरुप बाहेर काढले.
अळकुटी : पारनेर तालुक्यातील रांधे येथील पावडे वस्तीवर एका विहिरीत मंगळवारी रात्री (दि.१०) भक्ष्याच्या शोधात असताना बिबट्या पडला होता. ही बाब बुधवारी सकाळी शेतकरी दगडू पावडे यांच्या लक्षात आली. त्यानंतर वनखात्याच्या कर्मचा-यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन बिबट्याला सुखरुप बाहेर काढले.
बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती समजताच वनविभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कर्मचा-यांनी पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद केले. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. बिबट्याला विहिरीतून वर काढण्यासाठी वनपाल आणि वनविभाग कर्मचा-यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. यावेळी वनपरिमंडल अधिकारी एस.एस.साळवे, वनरक्षक वाघमारे, कर्मचारी नजीर शेख, बाळू पाचरणे, आर.बी.शेळके व रांधे, शेरी कासारी येथील नागरिकांनी सहकार्य केले.