पिंपळगाव कौडा शाळा झाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:21 AM2021-03-23T04:21:58+5:302021-03-23T04:21:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : नगर तालुक्यातील पिंपळगाव कौडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने शासनाच्या आरोग्य विभागाने पारित केलेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : नगर तालुक्यातील पिंपळगाव कौडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने शासनाच्या आरोग्य विभागाने पारित केलेल्या नवीन नऊ निकषाप्रमाणे तंबाखूमुक्त अभियान राबविण्यात आले. पिंपळगाव कौडा शाळेने हे सर्व नऊ नियम पूर्ण करुन तालुक्यातील पहिली तंबाखूमुक्त शाळा ठरली आहे. त्याबाबतचे पत्रही शाळेला प्राप्त झाल्याची माहिती शाळेतील उपक्रमशील शिक्षक प्रवीण शेरकर यांनी दिली.
शासनाच्या आदेशानुसार जिल्हा तंबाखूमुक्त नियंत्रण अभियानांतर्गत सलाम मुंबई फाउंडेशन व हम संस्था अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखूमुक्त अभियान कार्यक्रम राबविण्यात आला. यात नगर तालुक्यातील पिंपळगाव कौडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने पारित केलेले नवीन नऊ निकष पूर्ण केले.
या अभियानात पालक आणि विद्यार्थी यांनी तंबाखूमुक्तीची शपथ घेतली. तंबाखू नियंत्रणावर आधारित शाळेने विविध प्रकारचे उपक्रम राबविले. शाळेच्या १०० मीटर यार्ड परिसरात तंबाखू विक्री व सेवन करणाऱ्या व्यक्तीला दंड आकारण्यात येईल. शाळेपासून १०० मीटर यार्ड परिसर दिसेल असे पिवळ्या रंगाने रेखांकित करून तंबाखूमुक्त क्षेत्र असे लिहून जाहीर केले व नगर तालुक्यातील पहिली तंबाखूमुक्त शाळा केली. या संपूर्ण तंबाखूमुक्त अभियानात नगर तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत सोनार, सलाम मुंबई फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक अजय चव्हाण, तक्रार निवारण केंद्राचे जिल्हा सल्लागार डॉ. हर्षल पठारे, जिल्हा समन्वयक अतुल जाधव, शाळेतील उपक्रमशील शिक्षक प्रवीण शेरकर, राजेंद्र खडके, मच्छिंद्र जाधव, मंजुषा नरवडे, सीमा खोसे व शाळेचे मुख्याध्यापक सुनंदा ठोकळ तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष दळवी आदींचे मार्गदर्शन मिळाले.
................
२२ पिंपळगाव कौडा