पिंपळगाव माळवी ग्रामस्थांनी केली श्रमदानातून पुलाची दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:22 AM2021-09-27T04:22:45+5:302021-09-27T04:22:45+5:30

पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी पंचक्रोशीत मागील आठवड्यापासून झालेल्या भरपूर पावसामुळे सीना नदी दुथडी भरून वाहत आहे. ...

Pimpalgaon Malvi villagers repaired the bridge through hard work | पिंपळगाव माळवी ग्रामस्थांनी केली श्रमदानातून पुलाची दुरुस्ती

पिंपळगाव माळवी ग्रामस्थांनी केली श्रमदानातून पुलाची दुरुस्ती

पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी पंचक्रोशीत मागील आठवड्यापासून झालेल्या भरपूर पावसामुळे सीना नदी दुथडी भरून वाहत आहे. गावाजवळ असलेला सीना नदीवरील पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्यामुळे मेहेरबाबा फाटा परिसरातील वस्तीवरील लोकांचा गावांशी संपर्क तुटला होता. शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता परिसरातील ग्रामस्थांनी एकत्र येत लोकवर्गणी व श्रमदानातून पुलाची दुरुस्ती केली.

पिंपळगाव माळवी येथे अमरधामजवळ मागील वर्षी ग्रामस्थांनी छोटासा पूल तयार केला होता. परंतु, यावर्षीच्या पुराच्या पाण्यात पूल वाहून गेला. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी श्री संत सावता माळी पतसंस्थेचे संस्थापक प्रा. देवराम शिंदे यांनी पुढाकार घेऊन गावातील ग्रामस्थांना एकत्रित करून या पुलावर खडी, मुरूम टाकून रस्ता वाहतुकीस खुला केला. या श्रमदानाच्या कामात सरपंच राधिका प्रभूणे, सतीश बनकर, ग्रामपंचायत सदस्य सुधीर गायकवाड, बापू बेरड, सागर गुंड, विश्वनाथ गुंड, पप्पू झिने, बबन रायकर, गजानन सत्रे, दत्तात्रय गुंड, सुधीर प्रभुणे यांनी सहभाग नोंदविला.

----

२६ पिंपळगाव माळवी

पिंपळगाव माळवी येथे लोकसहभागातून पूल दुरुस्ती करताना.

260921\img_20210926_144856.jpg

पिंपळगाव माळवी : ग्रामस्थांनी सीना नदीवरील वाहून गेलेला पुल श्रमदानातून दुरुस्त केला.

छायाचित्र खासेराव साबळे

Web Title: Pimpalgaon Malvi villagers repaired the bridge through hard work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.