पिंपळगाव खांड तलाव ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 01:15 PM2020-07-03T13:15:47+5:302020-07-03T13:17:13+5:30

अकोले व संगमनेर तालुक्यातील शेतक-यांसाठी वरदान ठरलेले मुळा नदीवरील पिंपळगाव खांड लघु पाटबंधारे तलाव मंगळवारी रात्री उशिरा पूर्ण क्षमतेने भरला आहे. 

Pimpalgaon Sugar Lake Overflow | पिंपळगाव खांड तलाव ओव्हरफ्लो

पिंपळगाव खांड तलाव ओव्हरफ्लो

अकोले : अकोले व संगमनेर तालुक्यातील शेतक-यांसाठी वरदान ठरलेले मुळा नदीवरील पिंपळगाव खांड लघु पाटबंधारे तलाव मंगळवारी रात्री उशिरा  पूर्ण क्षमतेने भरला आहे. 

६०० दशलक्ष घनफूट क्षमतेच्या या धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहत असल्याने मुळा नदी वाहती झाली आहे. मुळा नदीवरील आंबित लघूपाटबंधारे तलाव यापूर्वीच ओसंडून वाहू लागला आहे.  पिंपळगाव खांड तलावात १० जूनपासून पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरु झाली होती. 

१८  जूनला मुळा नदीवरील अकोले-कोतूळ रस्त्यावरील पूल पुन्हा पाण्याखाली गेला व रस्त्यावरील वाहतूक बंद झाली
होती.

Web Title: Pimpalgaon Sugar Lake Overflow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.