अस्थी विसर्जन टाळून वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:21 AM2021-05-09T04:21:17+5:302021-05-09T04:21:17+5:30

आंबी खालसा गावचे प्रगतशील शेतकरी दत्तात्रय भाऊसाहेब ढमढेरे (वय ६६) यांचे नऊ दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले. १९७६ ...

Plantation avoiding bone immersion | अस्थी विसर्जन टाळून वृक्षारोपण

अस्थी विसर्जन टाळून वृक्षारोपण

आंबी खालसा गावचे प्रगतशील शेतकरी दत्तात्रय भाऊसाहेब ढमढेरे (वय ६६) यांचे नऊ दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले. १९७६ साली त्यांनी कृषी पदवी मिळवली होती. शेतीविषयक अनेकांना त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने ढमढेरे कुंटुब दुःखात बुडाले होते. दत्तात्रय ढमढेरे यांचा अंत्यविधी झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी रक्षा (अस्थी) विसर्जित करण्याचा कार्यक्रम होणार होता.

दरम्यान, दत्तात्रय ढमढेरे यांचा मुलगा डॉ.अमोल व सचिन, मुलगी प्रतिभा यांनी नदी प्रदूषण रोखण्यासाठी वडिलांच्या निधनानंतर रक्षा (अस्थी) नदीत विसर्जित न करता घऱाजवळच एक खड्डा खोदला. जुन्या परंपरेला नाकारून खड्ड्यामध्ये वृक्ष लावून त्यामध्ये अस्थी विसर्जित करण्यात आली.

.............

वडिलांची आठवण सदैव रहावी तसेच वृक्ष लावून अस्थी विसर्जन केल्याने पर्यावरणाचे व नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मदत होणार असल्याने अस्थीचे विसर्जन पाण्याऐवजी वरील पद्धतीने केले.

- डॉ.अमोल ढमढेरे

Web Title: Plantation avoiding bone immersion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.