अहमदनगर महाविद्यालयात एनएसएसच्या वतीने वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:14 AM2021-06-11T04:14:51+5:302021-06-11T04:14:51+5:30

पर्यावरण दिनानिमित्त आयोजित सप्ताहामध्ये आपापल्या परिसरात झाडे लावून ‘सेल्फी विथ ट्री’ उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत ७८ वृक्ष ...

Plantation on behalf of NSS at Ahmednagar College | अहमदनगर महाविद्यालयात एनएसएसच्या वतीने वृक्षारोपण

अहमदनगर महाविद्यालयात एनएसएसच्या वतीने वृक्षारोपण

पर्यावरण दिनानिमित्त आयोजित सप्ताहामध्ये आपापल्या परिसरात झाडे लावून ‘सेल्फी विथ ट्री’ उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत ७८ वृक्ष लावण्यात आले. यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अहमदनगर उपकेंद्र संचालक डाॅ. एन. आर. सोमवंशी, उपप्राचार्य डॉ. बी. एम. गायकर, उपप्राचार्य डॉ. ए. व्ही. नागवडे, उपप्राचार्य डॉ. सय्यद रज्जाक, नॅक समन्वयक डॉ. प्रीतम बेदरकर, ईटीआय संचालक डाॅ. शरद बोरुडे, रजिस्टार दीपक अल्हाट यांचे विशेष सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे संयोजन कार्यक्रम अधिकारी प्रा. अशोक घोरपडे यांनी केले. यासाठी उन्नत भारत अभियान संचालक प्रा. विलास नाबदे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. परकाळ भागवत, लायब्ररीयन डाॅ. प्रशांत फुगणर, प्रा. फरहान शेख, प्रा. नितीन बनसोडे यांचे आयोजनात सहकार्य केले. यासाठी आकाश खेडकर, सिमरन भुतिया, प्रतीक ढमढेरे, निलेश फसले, आरती शेडाळे, संस्कृती पारखे या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

------

फोटो - १० नगर काॅलेज

अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांच्या हस्ते एनएसएस विभागाद्वारे महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले.

Web Title: Plantation on behalf of NSS at Ahmednagar College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.