पोलीस मित्र फोर्सतर्फे वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:16 AM2021-06-25T04:16:42+5:302021-06-25T04:16:42+5:30
--------------------- सोमवंशी यांचा सत्कार अहमदनगर : अहमदनगर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. एन. आर. सोमवंशी यांची न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स ...
---------------------
सोमवंशी यांचा सत्कार
अहमदनगर : अहमदनगर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. एन. आर. सोमवंशी यांची न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स या स्वायत्त महाविद्यालयाच्या विद्या परिषदेवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. नितीन करमरकर यांच्या आदेशाने पुढील तीन वर्षाकरिता ही नियुक्ती ग्राह्य असेल. डाॅ. सोमवंशी हे सध्या पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर उपकेंद्राचे संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. अहमदनगर महाविद्यालयात ते प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख, त्याचबरोबर बायोटेक्नॉलॉजी विभागाचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. रजनीश बार्नबस यांच्या हस्ते बुधवारी सोमवंशी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. सय्यद रजाक, उपप्राचार्य बी. एम. गायकर, डॉ. डी. बी. मोरे व उपप्राचार्य डॉ. ए. वि. नागवडे उपस्थित होते.
-----------------
वसंत शिंदे यांचे सेट परीक्षेत यश
अहमदनगर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने डिसेंबर २०२० मध्ये घेण्यात आलेल्या सेंट परीक्षेत रुद्र अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. वसंत शिंदे उत्तीर्ण झाले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचा माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी युवा नेते अक्षय कर्डिले, बाणेश्वर पतसंस्थेचे चेअरमन राजू कर्डिले, बुऱ्हाणनगरचे सरपंच रावसाहेब कर्डिले, शेंडी ग्रामपंचातचे सदस्य अविनाश शिंदे, माजी सदस्य सुनील देठे, नागरदेवळे विविध कार्य.सोसायटीचे व्हाईस चेअरमन आदिनाथ शेलार आदी उपस्थित होते.
------------
रामदिन यांना श्रद्धांजली
अहमदनगर : येथील एक शिक्षक, गायक, चित्रकार प्रमोद रामदिन यांचे गत महिन्यात निधन झाले. त्यांना ‘गाता रहे मेरा दिल ग्रुप’च्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कवयित्री डॉ. कमर सुरुर, संगीतप्रेमी कुबेर पतके, संदिप भुसे, सईद खान, सहदेवजी आदी उपस्थित होते. यावेळी त्यांना श्रद्धांजली म्हणून हिंदी गीतांची मैफल आयोजित करण्यात आली होती. यात अमीन धाराणी, अपर्णा बालटे, समीर खान, सारिका रघुवंशी, गुलशन धाराणी, किरण उजागरे, डॉ. रेश्मा चेडे, गणेश सब्बन, सुनील भंडारी, मनोज डफळ, नीता माने, संजय माळवदे, विकास खरात, दिनेश मांजरेकर, डॉ. संतोष चेडे, संदीप भुसे, डॉ. सत्तार सय्यद, राजू सावंत, अनिल आंबेकर यांनी विविध गाणी सादर केली.