भाळवणी येथील शृंगऋषी डोंगरावर वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:15 AM2021-07-01T04:15:42+5:302021-07-01T04:15:42+5:30
भाळवणी : ‘आडवाटेचं पारनेर’ या टीमच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त भाळवणी येथील शृंगऋषी गडावर वृक्षारोपण व बीजारोपण मोहीम नुकतीच राबविण्यात आली. ...
भाळवणी : ‘आडवाटेचं पारनेर’ या टीमच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त भाळवणी येथील शृंगऋषी गडावर वृक्षारोपण व बीजारोपण मोहीम नुकतीच राबविण्यात आली.
आडवाटेचं पारनेरच्या सहकार्याने पारनेर तालुका ऑक्सिजन क्लस्टर बनविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही पद्मश्री पोपटराव पवार यांनी दिली. आडवाटेचं पारनेरच्या टीमने विविध वृक्षांच्या बियांची सीड बँक बनविली. या बिया व रोपांची तालुक्यातील विविध डोंगर व गड किल्ल्यांवर लागवड करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून शृंगऋषी गडावर वड, पिंपळ, कडुलिंब, करंजी, चिंच, बहावा, शिसम, आंबा अशा विविध तीन हजार बिया व रोपांची लागवड करण्यात आली, असे टीमचे सदस्य मेजर हरी व्यवहारे यांनी सांगितले.
यावेळी उपसरपंच इंजि. संदीप ठुबे, उद्योजक रंगनाथ रोहोकले, उद्योजक संदीप रोहोकले, निशिकांत रोहोकले, विजय रोहोकले, मेजर संतोष रोहोकले, छबन रोहोकले, राजू जाधव, संतोष भनगडे, अरुण रोहोकले, अनंत रोहोकले, प्रा. प्रमोद चेमटे, संतोष कदम, श्रद्धा थोरात, कृषिकन्या श्रद्धा ढवन, पत्रकार विनोद गोळे, राम तांबे, सचिन गायखे, संतोष सोनावळे, महाबली मिसाळ, अशोक गायकवाड, प्रफुल्ल कार्ले, नागेश्वर आरती मंडळाचे सुरेश भांबरकर, प्रणय रोकडे, आदी उपस्थित होते.
----
३० भाळवणी
भाळवणी येथील श्री क्षेत्र शृंगऋषी डोंगरावर वृक्षारोपण करताना पद्मश्री पोपटराव पवार, आडवाटेचं पारनेर टीमचे सदस्य व इतर.