पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना अमरापूरकर गौरव पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 02:07 PM2017-11-03T14:07:28+5:302017-11-03T14:10:42+5:30

अहमदनगर : थिंक ग्लोबल फौंडेशनचा या वर्षीचा स्व. सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना जाहीर झाला ...

Playback singer Suresh Wadkar has been honored with the Amrapurkar Gaurav Award | पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना अमरापूरकर गौरव पुरस्कार

पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना अमरापूरकर गौरव पुरस्कार

अहमदनगर : थिंक ग्लोबल फौंडेशनचा या वर्षीचा स्व. सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना जाहीर झाला आहे. फौंडेशनचे अध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत पुरस्काराची घोषणा केली.
जेष्ठ दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे ३ नोव्हेंबर २०१४ रोजी अकाली निधन झाले होते. त्यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून शुक्रवारी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. अमरापूरकर हे नगरचे भूषण होते. त्यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर हिंदी व मराठी नाट्य, चित्रपट क्षेत्रात आपले अढळ स्थान निर्माण केले. त्यांचे नाव व कार्य कायम स्मरणात राहावे व त्यांच्या नावे दिल्या जाणा-या पुरस्काराच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्ती व संस्था यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना सन्मानित करावे, या हेतूने मागील वर्षापासून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. ए. आर. रेहमान, आर. डी. बर्मन, शिव-हरी, बप्पी लहरी, अन्नू मलिक, विशाल भारद्वाज या हिंदीतील मोठ्या संगीतकारांबरोबर काम केलेल्या वाडकरांनी मराठीतील पं. हृदयनाथ मंगेशकर, श्रीनिवास खळे, सुधीर फडके, वसंत देसाई, अशोक पत्की, अनिल-अरुण यांच्या बरोबर देखील खूप काम केले आहे. लता मंगेशकर, आशा भोसले यांच्या बरोबर गायलेली त्यांची अनेक युगुल गीते लोकप्रिय आहेत. लवकरच नगर शहरात भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करून मान्यवरांच्या उपस्थितीत सुरेश वाडकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष किरण काळे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस शिल्पकार प्रमोद कांबळे, सीए राजेंद्र काळे, गायक पवन नाईक, मनपाचे माजी शहर अभियंता एन. डी. कुलकर्णी, चित्रपट निर्माते श्रीपाद दगडे, फौंडेशनचे पदाधिकारी स्वप्निल पाठक आदी यावेळी उपस्थित होते.

पद्मविभूषण देण्याची करणार मागणी

वाडकरांचे सांगितिक योगदान दैदिप्यमान असूनही त्यांना पद्मविभूषण, पद्मश्री या पुरस्कारांनी भारत सरकारने आजवर सन्मानित केले नाही, याची खंत वाटत असल्याचे यावेळी काळे म्हणाले. पद्म पुरस्कारासाठी महाराष्ट्र शासनाने वाडकरांच्या नावाची शिफारस भारत सरकारकडे करावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्याकडे लवकरच करणार असल्याचे यावेळी काळे यांनी सांगितले.

Web Title: Playback singer Suresh Wadkar has been honored with the Amrapurkar Gaurav Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.