पाथर्डीत धनगर समाजाचे ढोल वाजवून धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 05:03 PM2020-09-25T17:03:25+5:302020-09-25T17:04:08+5:30
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित प्रश्नांसाठी धनगर समाजाच्या वतीने शुक्रवारी पाथर्डी तहसीलसमोर ढोल वाजवत धरणे आंदोलन करण्यात आले.
पाथर्डी : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित प्रश्नांसाठी धनगर समाजाच्या वतीने शुक्रवारी पाथर्डी तहसीलसमोर ढोल वाजवत धरणे आंदोलन करण्यात आले.
धनगर समाज आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी संघर्ष करत आहे म्हणून धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमल बजावणी तातडीने करण्यात यावी. यासाठी सरकारला जागे करण्यासाठी शुक्रवारी दुपारी पाथर्डीच्या तहसील कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन केले. तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.
यावेळी अशोक चोरमले, जे.वाय.नरोटे, नवनाथ नरोटे, कल्पजीत डोईफोडे, संजय डोईफोडे, मुरलीधर डोईफोडे, संदीप लोखंडे, आश्रुबा खटके, महादेव ठोंबरे, दिगंबर सोलाट, लक्ष्मण काळे, दुबला खटके, भाऊसाहेब सुसलादे, अक्षय दातीर, दादासाहेब रूपनर, भिवा खटके, गोरक्ष ठोंबरे, आजिनाथ निचळ, केशराव ठोंबरे, भाऊसाहेब नरोटे, देविदास हंडाळ, बबनराव पालवे यांच्या निवेदनावर सह्या आहेत.