पोहेगावच्या विशेष ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 05:38 PM2021-02-13T17:38:22+5:302021-02-13T17:39:06+5:30
कोपरगाव तालुक्यातील पोहेगावात पंचवीस वर्षापूर्वी शिवसेना नेते नितीन औताडे हे सरपंच असताना दारूबंदीचा ठराव करण्यात आला होता. त्यावर गावातील ग्रामस्थांनी नुकतीच विशेष ग्रामसभा घेत पंचवीस वर्षांपूर्वी केलेला ठराव पुन्हा समंत केला आहे.
कोपरगाव : तालुक्यातील पोहेगावात पंचवीस वर्षापूर्वी शिवसेना नेते नितीन औताडे हे सरपंच असताना दारूबंदीचा ठराव करण्यात आला होता. त्यावर गावातील ग्रामस्थांनी नुकतीच विशेष ग्रामसभा घेत पंचवीस वर्षांपूर्वी केलेला ठराव पुन्हा समंत केला आहे.
केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी जर काही लोक अवैध धंदे करणा-यांना पाठीशी घालत असतील, तर ही बाब दुर्दैवी आहे. आमचा कोणा एका व्यक्ती सोबत वाद नाही. मात्र, अवैध धंदे करणारी कोणतीही व्यक्ती असो त्याला आम्ही आमच्या भाषेत उत्तर देऊ, असा इशारा शिवसेना नेते नितीन औताडे यांनी दिला आहे.
औताडे म्हणाले, लोकशाही मार्गाने सार्वजनिक रित्या दारूबंदी विरोधात उठाव करावा लागेल. सतत लढा द्यावा लागेल. कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत, असेल तर त्याला सर्वस्वी पोलीस जबाबदार राहतील. अवैद्य दारु विक्री विरोधात प्रशासनाला जागे करण्यासाठी कोणतेही आंदोलन करण्यासाठी पोहेगाव ग्रामस्थ सज्ज आहेत. ग्रामसभेने दाखवून दिले आहे. अवैध दारूविक्री लवकरात लवकर बंद होण्यासाठी शिर्डी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.