गवतातून विषबाधा : राहुरीत १४ जनावरे दगावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 07:48 PM2018-06-02T19:48:55+5:302018-06-02T19:49:24+5:30
गवत खाल्ल्यामुळे झालेल्या विषबाधेतुन २१ जनावरे दगावल्याची घटना आज घडली. कोल्हार खुर्द शिवारात पाटील वाडी येथे १४ मेंढ्या, ४ शेळ््या, ३ कोकरू दगावले असून दीड ते दोन लाखाचे नुकसान झाले.
राहुरी : गवत खाल्ल्यामुळे झालेल्या विषबाधेतुन २१ जनावरे दगावल्याची घटना आज घडली. कोल्हार खुर्द शिवारात पाटील वाडी येथे १४ मेंढ्या, ४ शेळ््या, ३ कोकरू दगावले असून दीड ते दोन लाखाचे नुकसान झाले.
गोरक्षनाथ कुलधरण हे पहाटे साडेतीनच्या सुमारास उठले असता ५० जनावरांपैकी १४ जनावरे दगावल्याचे लक्षात आले. त्यानंतर वैद्यकीय आधिकारी डॉ़प्रदीप सातपुते यांनी पोस्टमार्टम केले़ पडीत जमीनीवर उगलेल्या गवताला जास्त किंवा कमी प्रमाणावर पाणी मिळाल्यानंतर नाईट्राईट गवतामध्ये तयार होते त्यामुळे जनावरे दगावण्याची भिती असते.