३ लाखांची लाच घेणारा पोलिस अटकेत, एक पोलीस फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:42 PM2018-07-17T12:42:45+5:302018-07-17T12:43:39+5:30
गुन्ह्यात नाव न घेण्यासाठी तब्बल ३ लाख रुपयांची लाच घेणा-या एका पोलिसाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहाथ पकडण्यात आले. तर त्याचा साथीदार दुसरा पोलीस फरार झाला असून या दोघांविरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर : गुन्ह्यात नाव न घेण्यासाठी तब्बल ३ लाख रुपयांची लाच घेणा-या एका पोलिसाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहाथ पकडण्यात आले. तर त्याचा साथीदार दुसरा पोलीस फरार झाला असून या दोघांविरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल टॅक्ट्रर चोरीच्या गुन्ह्यात तक्रारदार व त्याचा भाऊ यांची नावे न घेण्यासाठी दोन पोलिसांनी तब्बल सात लाखांची लाच मागितली. अशोक शशिकांत गाडे( शिर्डी पोलीस ठाणे, जि.अहमदनगर), आणि अल्फाफ अहमद शेख ( पोलीस हवालदार, शिर्डी पोलीस ठाणे जि.अहमदनगर) या दोघांनी तब्बल ७ लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती साडेतीन लाख रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सापळा लावून कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलीस शिपाई अशोक गाडे यास ३ लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. तर पोलीस हवालदार अल्फाफ शेख हा फरार झाला आहे. दोन्ही आरोपींविरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.