वाळूतस्करीविरोधात पोलिसांची धडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 04:11 PM2019-06-20T16:11:08+5:302019-06-20T16:12:45+5:30
जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध वाळूतस्करीविरोधात धडक मोहीम राबवित चार दिवसांत पंधरा ठिकाणी कारवाई केली़
अहमदनगर : जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध वाळूतस्करीविरोधात धडक मोहीम राबवित चार दिवसांत पंधरा ठिकाणी कारवाई केली़ या कारवाईत २२ जणांविरोधात गुन्हा दाखल करत १ कोटी १९ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़
नेवासा येथे एक टेम्पो व दोन ब्रास वाळू जप्त करण्यात आली़ येथे गोविंद शिवाजी राऊत (वय ३५ रा़) व संदीप म्हस्के (दोघे रा़ नेवासा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ राहुरी येथे एक टेम्पो व एक ब्रास वाळू जप्त करत ऋषी भुजाडी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे़ नगर तालुक्यात एक डंपर व चार ब्रास वाळू जप्त करून महेश रमेश कुलट (रा़ टाकळी खातगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला़ श्रीगोंदा येथे वाळूसह पाच ट्रॅक्टर जप्त करून निहाल इस्माईल शेख, सचिन दत्तात्रय झिटे, विठ्ठल अण्णा बाबार व मन्सूर महेबुब पिरजादे (रा़ पेडगाव ता़ श्रीगोंदा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला़
संगमनेर येथे केलेल्या कारवाईत मुद्देमाल जप्त करत रवींद्र भाऊराव पांडव, सोमनाथ अंबादास वºहाडे, गणेश साहेबराव शिंदे, रमेश काळे, अमोल बारे, लालू शहा, गणेश गुंजाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ जामखेड येथे केलेल्या कारवाईत २१ ब्रास वाळू, वाहने जप्त करून मन्सूर दगडूभाई शेख, वैजनाथ भाऊसाहेब शिंदे, मौलाना सत्तार शेख, परमेश्वर पांडुरंग पठारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़