घोड नदीपात्रातील वाळूतस्करीवर पोलीसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 02:53 PM2018-12-04T14:53:09+5:302018-12-04T14:53:25+5:30

वांगदरी येथील घोड नदी पात्रात अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या नेतृत्वा

 Police action on sandstorm in Ghode river bed | घोड नदीपात्रातील वाळूतस्करीवर पोलीसांची कारवाई

घोड नदीपात्रातील वाळूतस्करीवर पोलीसांची कारवाई

श्रीगोंदा : वांगदरी येथील घोड नदी पात्रात अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या नेतृत्वाखाली पथकाने छापा टाकून वाळू उपसा करणारे चार जेसीबी, चार टॅक्टर ताब्यात घेतले. सुमारे ६० लाखांचा मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेतला. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
श्रीगोंदा पोलिस व महसुल यांच्या कृपेने वांगदरी शिवारात बेसुमार अवैध वाळू उपसा चालू असल्याची माहिती मीना कुमार यांना समजली. त्यांनी भीमा नदीत वाळू तस्करीच्या विरोधात कारवाई करावयाची आहे असे सांगुन पोलिस पथक साथीला घेतले. ढोकराई फाट्यावर येताच मोर्चा वांगदरी कडे वळवला. त्यामुळे वाळू तस्करांच्य खब-यांना थांगपत्ता लागण्यापूर्वी घोड नदीत छापा टाकला. पोलिस कारवाई सुरू करण्याचे काम चालू होते.

 

Web Title:  Police action on sandstorm in Ghode river bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.