तारकपूर येथे पोलीस पथकावर दगडफेक : तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 11:09 AM2018-08-04T11:09:17+5:302018-08-04T11:09:45+5:30
शहरातील तारकपूर परिसरातील शांतीपूर येथे पत्र्याचे शेड व वाहनांची तोडफोड करणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर दगडफेक करत धक्काबुक्की करण्यात आली. गुरूवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.
अहमदनगर : शहरातील तारकपूर परिसरातील शांतीपूर येथे पत्र्याचे शेड व वाहनांची तोडफोड करणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर दगडफेक करत धक्काबुक्की करण्यात आली. गुरूवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.
आशिष रघुवीर गायकवाड, राकेश विठ्ठल वैरागर व मनोज विठ्ठल वैरागर यांनी तारकपूर येथील गणेश जगदीशलाल मनोचा यांना चाकुचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व रोख रक्कम काढून घेतली तसेच मनोचा यांचे पत्र्याचे शेड व वाहने तोडण्यास सुरूवात केली. याबाबत मनोचा यांनी तोफखाना पोलीसांना घटनेची माहिती दिली. सहाय्यक फौजदार बाळू अढागळे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाल, तेंव्हा त्या तिघांना पोलिसांच्या वाहनावरही दगडफेक करत त्यांना धक्काबुक्की केली. यावेळी पोलिसांनी तिघांना घटनास्थळी ताब्यात घेतले. जिल्हा न्यायालयाने त्यांना ६ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दगडफेक करणा-या तिघांवर सरकार कामात अडथळा आणने व चोरी असे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल सणस हे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.