मास्क न बांधणाऱ्यांना पोलिसांनी पाजला उसाचा रस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:20 AM2021-03-31T04:20:18+5:302021-03-31T04:20:18+5:30
राहुरी : राज्यासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न व तयारी ...
राहुरी : राज्यासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न व तयारी करीत आहे. राहुरीमधील पोलिसांनी उन्हाच्या काहिलीमध्ये मास्क न बांधणाऱ्या लोकांना उसाचा रस पाजला व कोरोनासंदर्भात जनजागृती केली.
राहुरी शहरात कोरोना रोखण्यासाठी प्रशासन सज्ज झालेले असताना विनामास्क फिरणारे व नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महसूल, पोलीस व नगर परिषद प्रशासन चौकाचौकांत कारवाई करीत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (३० मार्च) नगर-मनमाड राज्य मार्गावर पोलीस प्रशासनातील वाहतूक शाखेचे पो. कॉ. मनोज राजपूत कर्तव्य बजावत होते. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर ते दंडात्मक कारवाई करीत होते. परंतु याच वेळेला पोलिसातील मानवतेला सलाम करणारे दृश्यही समोर आले. भर उन्हात फिरणारे नागरिक विनामास्क फिरताना आढळले. मात्र त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करताना राजपूत यांनी त्यांना उसाचा थंडगार रस पाजून त्यांना दिलासा देत प्रबोधन केले.
येथून पुढे तरी मास्क वापरा, अशी हात जोडून विनंतीही केली. हे दृश्य पाहून अनेकांनी खाकीतील माणुसकी पाहून त्यांना सॅल्यूट ठोकला. तर काहींनी “जय हिंद” म्हणत त्यांच्या या कृतीचे विशेष कौतुक केले.
...