तडीपार गुंडासोबत नाचला पोलीस दादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 02:28 PM2019-09-18T14:28:31+5:302019-09-18T14:29:03+5:30

कायदा आणि सुव्यवस्थेची धुरा ज्याच्या खांद्यावर आहे तोच पोलीस मिरवणुकीत थेट तडीपारीची कारवाई झालेल्या गुंडासोबत मनसोक्त नाचून त्याच्यावर नोटा ओवाळून पैशांचे प्रदर्शन करतो़ याबाबतचा व्हायरल झालेला व्हिडिओ सध्या शहरात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे़ 

Police grandfather danced with Tadipar gangster | तडीपार गुंडासोबत नाचला पोलीस दादा

तडीपार गुंडासोबत नाचला पोलीस दादा

अहमदनगर : कायदा आणि सुव्यवस्थेची धुरा ज्याच्या खांद्यावर आहे तोच पोलीस मिरवणुकीत थेट तडीपारीची कारवाई झालेल्या गुंडासोबत मनसोक्त नाचून त्याच्यावर नोटा ओवाळून पैशांचे प्रदर्शन करतो़ याबाबतचा व्हायरल झालेला व्हिडिओ सध्या शहरात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे़ 
व्हायरल व्हिडिओत कोतवाली ठाण्यातील साध्या वेशातील पोलीस दादा आणि तडीपारीची कारवाई झालेला गुंड रशिद डंडा स्पष्टपणे दिसत आहेत़ कोतवाली आणि तेथील डिबी ब्रँच दोन वर्षांपासून चर्चेचा विषय ठरत आहे़ गुन्ह्यांचे प्रकटीकरण करण्यापेक्षा येथील कर्मचारी नको त्या भानगडीच जास्त करतात़ आता तर डिबीच्या एका दादाने कहरच केला़ मागील आठवड्यात शहरातून मोहरम विसर्जन मिरवणूक निघाली होती़ ही मिरवणूक येथील जुने कोर्ट परिसरात आली तेव्हा या दादाला चांगलाच ताल चढला़ इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी डोळ्यात तेल घालून मिरवणुकीवर लक्ष ठेवून होते़ तेव्हा हे साहेब डंडासोबत नाचण्यात दंग होते़ नाचतानाचता हातात नोटांचा बंडल घेऊन डंडाच्या डोक्यावरून नोटा ओवाळून वाटत होता़ रशिद डंडा याच्यावर कोतवाली आणि तोफखाना पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत़ नगर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा येऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने त्याचा प्रस्ताव तयार करून पाठविल्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्याला शहरातून तडीपार केले आहे़ सध्या तो जामिनावर शहरात आला आहे़ मिरवणुकीत डंडा याला पाहून डिबीच्या दादाचे चांगलेच पे्रम उतू गेले अन् कुठलेच भान न ठेवत थेट डान्सच केला़ आता वरिष्ठ पोलीस अधिकारी यावर काय निर्णय घेतात़ याची प्रतीक्षा नगर शहरातील जनतेला आहे़ 

Web Title: Police grandfather danced with Tadipar gangster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.