पोलीस राबवणार हाय-वे मृत्युंजय दूत योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:38 AM2021-03-04T04:38:33+5:302021-03-04T04:38:33+5:30
अभियानाची सुरुवात डॉ. राधेश्याम गुंजाळ वैद्यकीय महाविद्यालयात हाय-वे मृत्युंजय दूत, परिसरातील डॉक्टर्स, शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत करण्यात ...
अभियानाची सुरुवात डॉ. राधेश्याम गुंजाळ वैद्यकीय महाविद्यालयात हाय-वे मृत्युंजय दूत, परिसरातील डॉक्टर्स, शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत करण्यात आली. हद्दीतील नाशिक-पुणे महामार्गावर व राज्य महामार्गावर जागोजागी हे दूत ठेवण्यात येणार आहेत. अपघातातील जखमी व्यक्तींना सेवा कशी द्यावी, याबाबत त्यांना प्रशिक्षणही देण्यात येत आहे. यात महामार्गावरील गॅरेज, लोकल ढाबा, हॉटेल, पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या व्यक्तींसह काही खासगी हॉस्पिटल तसेच सरकारी हॉस्पिटल डॉक्टर यांचा यात समावेश आहे.
वाहतूक पोलीस केंद्र डोळासणे येथील पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांनी दिली आहे. डॉ. राधेश्याम गुंजाळ वैद्यकीय महाविद्यालय येथे या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कर्जुले पठारचे सरपंच रवींद्र भोर, संदीप भागवत, डॉ. सुरेश ढगे, प्रदीप गुंजाळ, धनंजय पेंडभाजे उपस्थित होते.