पोलिसांकडून आरोपीसह घटनास्थळाची पाहणी
By Admin | Published: July 27, 2016 12:07 AM2016-07-27T00:07:52+5:302016-07-27T00:35:46+5:30
अहमदनगर/कुळधरण : कर्जत तालुक्यातील कोपर्डी हत्याकांड प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सोमवारी सायंकाळी घटनेतील मुख्य आरोपी
अहमदनगर/कुळधरण : कर्जत तालुक्यातील कोपर्डी हत्याकांड प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सोमवारी सायंकाळी घटनेतील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याला अतिशय शिताफीने घटनास्थळी नेऊन स्पॉट व्हेरीफिकेशन पूर्ण केले़
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व या प्रकरणातील तपासी अधिकारी शशिराज पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ‘पोलीस’ नामोल्लेख नसलेल्या वाहनातून शिंदे याला सोमवारी सायंकाळी कोपर्डीत नेले़ पथकातील सर्व कर्मचारी साध्या वेशात तर आरोपीचा पेहरावही बदलविण्यात आला होता़ त्यामुळे पोलिसांसह आरोपीसही कुणी ओळखले नाही़ घटना घडल्यानंतर कोपर्डीत पीडित कुटुंबाची भेट घेण्यास दररोज मोठी गर्दी होत आहे़ सोमवारीही घटनास्थळी मोठी गर्दी होती़ त्यामुळे पोलिसांसमोर आरोपीला घटनास्थळी घेऊन जाणे मोठे आव्हान होते़ त्या ठिकाणी आरोपीला कुणीही ओळखले असते तर उपस्थितांचा संताप अनावर झाला असता़ त्यामुळे पथकाने पूर्णत: गुप्तता बाळगून हे काम पूर्ण केले़ आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल करताना सबळ व सक्षम पुराव्याची गरज असल्याने स्पॉट व्हेरिफिकेशन पोलिसांच्या दृष्टिने महत्त्वाचा विषय होता़
(प्रतिनिधी)