पोलिसांची अवैध व्यवसायांवर करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:23 AM2021-05-27T04:23:16+5:302021-05-27T04:23:16+5:30
मंगळवारी अवैध दारू विक्री करणाऱ्या दोघांवर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहरातील शाहूनगर भागात अवैध दारू विक्री ...
मंगळवारी अवैध दारू विक्री करणाऱ्या दोघांवर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहरातील शाहूनगर भागात अवैध दारू विक्री करणारा काशीनाथ भीमराव शिंदे व सुनील अर्जुन मेंगाळ या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३४६० रुपये देशी दारू मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बुधवारी देवठाण शिवारात आरोपी राजू वसंत बोडखे याच्या शेतातील शेडमध्ये पैसे लावून तिरट जुगार खेळताना राजू बोडखे, मच्छिंद्र लक्ष्मण साळुंखे, रा. नवलेवाडी, गणेश नामदेव बोडके, रा. देवठाण, सोमनाथ बारकू उघडे, रा. वीरगाव, अनुप केदारनाथ नापेड, रा. संगमनेर या पाचजणांवर गुन्हा दाखल केला आहे. १५ लाख ११ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात घेऊन शुभम संजय चव्हाण यास अटक केली आहे.