रुग्णांसह पोलिसांना जेवणाचे डबे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:21 AM2021-05-09T04:21:34+5:302021-05-09T04:21:34+5:30
पोलिसांसाठी जेवणाचे डबे प्रातिनिधिक स्वरूपात तोफखाना पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक किरण सुरसे, उपनिरीक्षक समाधान सोळंके, पिंगळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात ...
पोलिसांसाठी जेवणाचे डबे प्रातिनिधिक स्वरूपात तोफखाना पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक किरण सुरसे, उपनिरीक्षक समाधान सोळंके, पिंगळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी घर घर लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, जनक आहुजा, प्रदीप पंजाबी, संजय चोपडा, अर्जुन मदान, मनोज मदान, गौरव नय्यर, ईश्वर बोरा, प्रतीक बोगावात, अंगद मदान, कैलाश नवलाणी, नरेंद्र छाबरिया, प्रीतपालसिंग धुप्पड, प्रशांत मुनोत, राहुल बजाज, राजा नारंग, सतीश गंभीर, मनू कुकरेजा, करण धुप्पड, सिमर वधवा, सुनील थोरात, प्रसाद पंतम, शरद बेरड, गोविंद खुराणा, पुरुषोत्तम बेत्ती, बलजितसिंह बीलरा, मनित भल्ला, दिनेश चोपडा आदी उपस्थित होते. यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले, घर घर लंगर सेवा व मोरया युवा प्रतिष्ठानने कोरोनाच्या काळात माणुसकी जपली आहे. शहरातील कोविड सेंटरमध्ये बाहेरगावावरून आलेल्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांना दोनवेळचे जेवण उपलब्ध करून देण्याचे काम ते करत आहे. पहिल्या लाटेतदेखील त्यांनी परप्रांतीयांची भूक भागवली. काही सामाजिक संघटना मदतीचा हात देऊन माणुसकीचे दर्शन घडवित असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. हरजितसिंह वधवा यांनी लंगर सेवेचे सर्व सेवादार या संकटकाळात सेवा देत असल्याचे स्पष्ट केले.
ओळी- घर घर लंगर सेवा व मोरया युवा प्रतिष्ठानच्या वतीने शहरात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस बांधवांसह कोविड सेंटरमधील रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना जेवणाचे डबे देण्यात आले.