पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करणा-या २२ जणांना १० एप्रिलपर्यत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 03:22 PM2018-04-08T15:22:31+5:302018-04-08T17:23:41+5:30

पोलीस अधीक्षक कार्यालयात धुडगुस घालून तोडफोड केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या २२ आरोपींना न्यायालयाने १० एप्रिलपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Police personnel detained for attacking the Superintendent of Police, till April 10 | पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करणा-या २२ जणांना १० एप्रिलपर्यत पोलीस कोठडी

पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करणा-या २२ जणांना १० एप्रिलपर्यत पोलीस कोठडी

ठळक मुद्देकार्यालायवर दगडफेक

अहमदनगर : पोलीस अधीक्षक कार्यालयात धुडगुस घालून तोडफोड केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या २२ आरोपींना न्यायालयाने १० एप्रिलपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. रात्री अटक केलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आज दुपारी न्यायालयात हजर केले होते.
कैलास गिरवले, शरिफ शेख, राहुल अरुण चिंतामण, अ‍ॅड. प्रसन्न जोशी, सय्यद अकबर, आवेश शेख, सय्यद असिफ, सागर वाव्हळ, संजय वाल्हेकर, अनिल राऊत, अनिकेत चव्हाण, गिरीष गायकवाड, दिपक गाडीलकर, रियाज तांबोळी, दत्ता उगले, कुणाल घोलप, साईनाथ लोखंडे, सचिन गवळी, सोमनाथ गाडेकर, संतोष सुर्य वंशी, धर्मा करांडे, इम्रान शेख या २२ आरोपींना १० एप्रिलपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
याशिवाय भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले, दादाभाऊ कळमकर, सचिन अरुण जगताप, अभिजित कळमकर, बाबासाहेब गाडळकर, अभिजित खोसे, कुमार वाकळे, निखिल वारे, दादा दरेकर, गजानन भांडवलकर, मुसा सादीक शेख, सागर ठोंबरे, घनश्याम बोडखे, सागर पंधाडे, मतीन सय्यद, सुरेश बनसोडे, सागर डोंगरे, अफजल शेख, कुलदीप भिंगारदिवे, बबलू सुर्यवंशी, विशाल सुर्यवंशी, सुनिल त्रिंबके, दत्ता तापकीरे, अंकुश चत्तर, वैभव वाघ, सादीक अब्दुल रौफ सय्यद, मुस्सदीक सादीक सय्यद, अवधूत जाधव, राजेश परकाळे, धीरज उर्कीडे, मयूर कुलथे यांच्यावरही तोडफोडप्रकरमी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केडगाव येथील सेनेच्या कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी आमदार संग्राम जगताप यांना चौकशीसाठी शनिवारी रात्री पोलीस अधीक्षक कार्यालयात आणले असताना राष्ट्रवादी मोठ्या संख्येने कार्यकर्ते कार्यालयात दाखल झाले. या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालायवर दगडफेक करुन, कार्यालयाचे दरवाजे लाकडी दांडक्याने तोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करुन अनधिकृतरित्या कार्यालयात प्रवेश केला व बंदोबस्तासाठी असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पोलीस नाईक संदीप घोडके यांना मारहाण करुन जखमी केले. भिंगार पोलीस ठाण्यात भादवि ३५३, ३३३,१४३, १४७,१४८, १४९, ४५२, ४२७, ३२३, ५०४ सह सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायदा कलम ३,७ सह सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
 

Web Title: Police personnel detained for attacking the Superintendent of Police, till April 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.