पार्टीवर पोलिसांचा छापा : १८ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 10:11 AM2020-04-11T10:11:24+5:302020-04-11T10:12:55+5:30
पोलिसांनी मांडवगण येथील गोसावीवाडीत सुरु असलेल्या बिर्याणीची पार्टीवर, सांगवी येथील जुगार अड्ड्यावर, श्रीगोंदा शहरात मोकाट फिरणाऱ्या आणि लिंपणगाव येथील मोटार चोरी प्रकरणी एकूण १८ जणांना अटक केली आहे.
श्रीगोंदा : पोलिसांनी मांडवगण येथील गोसावीवाडीत सुरु असलेल्या बिर्याणीची पार्टीवर, सांगवी येथील जुगार अड्ड्यावर, श्रीगोंदा शहरात मोकाट फिरणाऱ्या आणि लिंपणगाव येथील मोटार चोरी प्रकरणी एकूण १८ जणांना अटक केली आहे.
संचारबंदी लागू असताना मांडवगण गावातील गोसावीवाडीत आंब्याच्या झाडाखाली बिर्याणीची पार्टीसाठी तरुण जमले होते. पोलिसांनी छापा टाकून विशाल वाल्मिक कुसेकर, वैभव प्रकाश मनवरे, गौरव नवनाथ मनवरे, राहुल बापू पवार, रवींद्र वाल्मिक कुसेकर, भाऊसाहेब गोरख पवार, अतुल श्रावण चौगुले, ऋतिक विठ्ठल जाधव, चेतन राजू मनवरे, सुरज अशोक मनवरे, भास्कर मारुती कुसेकर यांना अटक केली. शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. पोलिस हेड कॉन्स्टेबल अनिल साठे यांनी फिर्याद दाखल केली.
श्रीगोंदा पोलिसांनी शुक्रवारी दुपारी सांगवी दुमाला शिवारात छापा मारुन राजेंद्र नारायण रणपिसे, राजाराम झुंबर रणपिसे, धर्मेंद्र उद्धव रणदिवे, अमोल चंद्रकांत शिर्के, बापू दत्तात्रय भोईटे या जुगार खेळणाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून दोन हजाराची रोकड रक्कम जप्त केली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संजय काळे यांनी फिर्याद दाखल केली.
संचारबंदी लागू असताना श्रीगोंदा शहरात अलिशान गाडीतून मोकाट फिरणारे ऋषिकेश रामचंद्र महामुनी आणि नंदकिशोर प्रकाश यांना अटक केली. एम. एच.- १६, बी. एच.- ८०२१ नंबरची चारचाकी कार जप्त केली. पोलिस हेड कॉन्स्टेबल अविनाश ढेरे यांनी फिर्याद दाखल केली.