जातेगावात अफूच्या शेतात पोलिसांचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:27 AM2021-02-27T04:27:04+5:302021-02-27T04:27:04+5:30
जामखेड/खर्डा : जातेगाव (ता.जामखेड) येथे एका शेतात छापा टाकून पोलीस पथकाने ५६ किलो वजनाची व १ लाख ७० हजार ...
जामखेड/खर्डा : जातेगाव (ता.जामखेड) येथे एका शेतात छापा टाकून पोलीस पथकाने ५६ किलो वजनाची व १ लाख ७० हजार रुपये किमतीची झाडे जप्त केली. पोलिसांनी गुरुवारी (दि.२५) रात्री आठ वाजता ही कारवाई केली.
याप्रकरणी शेतकरी वासुदेव महादेव काळे (वय ३९, रा. जातेगाव, ता. जामखेड) याच्या विरोधात अंमली औषधे द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम सन १९८५ चे कलम १५ क प्रमाणे जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
जातेगाव येथे एका शेतकऱ्याने शेतात अफूची लागवड केल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना गुरुवारी (दि.२५) मिळाली. त्यानंतर गुरुवारी रात्री आठ वाजता तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहायक फौजदार विठ्ठल गायकवाड, संजय लाटे, संदीप आजबे, संग्राम जाधव, विजयकुमार कोळी, अविनाश ढेरे, आबासाहेब आवारे, संदीप राऊत, सचिन पिरगळ, हनुमान आरसुळ यांच्या पथक जातेगाव येथील शेतकरी वासुदेव काळे याच्या शेतात छापा टाकला. शेतात ५६ किलो वजनाची अफूची झाडे आढळून आली. ही झाडे १ लाख ७० हजार रुपये किमतीची आहेत. पोलिसांनी पंचनामा करून अफूच्या झाडांची लागवड करणाऱ्या वासुदेव काळे याला अटक केली.
---
२६ जामखेड अफू, १
जातेगाव येथे एका शेतात अफूची झाडे जप्त करण्यात आली. यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व इतर कर्मचारी.