कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 12:29 PM2021-01-05T12:29:48+5:302021-01-05T12:31:57+5:30
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने सोमवारी (दि.४) रात्री ९ वाजता प्रत्यक्षात कत्तलखान्यावर छापा टाकून ८५५ किलो गोमांससह १६ लहान मोठी जिवंत जनावरे असा एकूण २ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत गेला आहे.
कोपरगाव: शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने सोमवारी (दि.४) रात्री ९ वाजता प्रत्यक्षात कत्तलखान्यावर छापा टाकून ८५५ किलो गोमांससह १६ लहान मोठी जिवंत जनावरे असा एकूण २ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत गेला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी वसिम फारुख कुरेशी ( वय १८ ), अक्रम फकिर कुरेशी (वय २७),खलील जमाल कुरेशी (वय ३६ ) तिघे रा. आएशा काँलनी, कोपरगाव ) यांच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून करून तिघांनाही अटक केली आहे.
सदरची कारवाई शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे, सहायक फौजदार शैलेंद्र ससाणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल आर. पी. पुंड, रामकृष्ण खारतोडे, संभाजी शिंदे, प्रकाश कुंडारे, सुरज अग्रवाल यांच्या पथकाने केली आहे.