हॉस्पिटलचे खोटे कारण सांगून फिरणा-यांना पोलिसांचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 01:52 PM2020-03-24T13:52:34+5:302020-03-24T13:53:39+5:30
पोलिसांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी काही जणांंनी फिरणारांनी एक शक्कल काढली आहे. खिशात हॉस्पिटल अथवा मेडिकलची प्रिस्क्रिप्शन घेऊन घराबाहेर पडायचे आणि सर्व शहरात फिरायचे. पोलिसांनी मात्र असे बारा हिंडफिरे शोधून त्यांच्यावर कारवाई केली आहे.
अहमदनगर: पोलिसांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी काही जणांंनी फिरणारांनी एक शक्कल काढली आहे. खिशात हॉस्पिटल अथवा मेडिकलची प्रिस्क्रिप्शन घेऊन घराबाहेर पडायचे आणि सर्व शहरात फिरायचे. पोलिसांनी मात्र असे बारा हिंडफिरे शोधून त्यांच्यावर कारवाई केली आहे.
फिरणाºया या लोकांकडून आढळून आलेले हॉस्पिटलचे कागदपत्र व मेडिकलच्या प्रिस्क्रिप्शन या जुन्या असल्याचे आढळून आले. ज्यांचे खरोखरच हॉस्पिटलमध्ये काम आहे अथवा त्यांचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहेत त्यांना जाण्यास मुभा आहे. प्रशासनाने कलम १४४ कलम लागू करून जमाबंदी व संचारबंदी लागू केली आहे. मात्र अनेक जण विनाकारण घराबाहेर पडून फिरत आहेत. पोलिसांनी समजावून सांगितल्या नंतरही अनेकजण याकडे दुर्लक्ष करीत आहेत. सोमवारी दिवसभर कारवाईदरम्यान पेट्रोलिंग करताना पोलीस पथकांना काहीजण वेगवेगळ्या ठिकाणी परत-परत आढळून आले. घराबाहेर पडण्याचे कारण त्यांनी हॉस्पिटलचे सांगितले. पोलिसांनी मात्र त्यांच्याकडे अधिक चौकशी केली तेव्हा त्यांना योग्य उत्तरे देता आले नाहीत. अशा लोकांवर कारवाई करण्यात आली आहे.