‘‘त्या’’ पाचजणांचे पोलिसांनी घेतले जबाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:20 AM2021-04-06T04:20:14+5:302021-04-06T04:20:14+5:30
सोमवारी पोलिसांनी चौकशी केली. यावेळी सर्वांचे जबाब नोंदवून घेण्यात आले. या चौकशीत महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांच्या हाती आल्याचे समजते. जरे ...
सोमवारी पोलिसांनी चौकशी केली. यावेळी सर्वांचे जबाब नोंदवून घेण्यात आले. या चौकशीत महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांच्या हाती आल्याचे समजते.
जरे यांची हत्याकांड घडवून आणल्यानंतर बोठे नगर शहरातून पसार झाला होता. घटनेच्या तीन महिन्यांनंतर पोलिसांनी त्याला हैदराबाद येथून अटक केली. फरार असताना त्याने काहीजणांना संपर्क केला होता. तसेच घटनेपूर्वीही तो काही लोकांच्या सतत संपर्कात होता. तपासात ही बाब समोर आल्यानंतर चौकशीसाठी पोलिसांनी एकूण आठजणांना नोटीस पाठवली होती. त्यापैकी सोमवारी पाचजणांची चौकशी झाली. उर्वरित तीनजणांची येत्या दोन दिवसांत चौकशी होणार आहे. जरे हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले असून येत्या काही दिवसांत बोठे याच्याविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे. त्याच अनुषंगाने पोलीस भक्कम पुराव्यांची जुळणी करत आहेत. जरे यांच्या हत्येपूर्वी व त्यानंतर बोठे याने वारंवार कुणाला संपर्क केला याची माहिती पोलिसांनी काढली असून त्या अनुषंगाने आतापर्यंत बहुतांश जणांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.
.......
पोलीस संरक्षण पूर्ववत करण्याची मागणी
मृत रेखा जरे यांचा मुलगा रूणाल जरे व त्यांचे वकील सचिन पटेकर यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. बोठे याला अटक केल्यानंतर जरे यांचे संरक्षण कमी करण्यात आले असून वकिलाचे संरक्षण काढले आहे. बोठे याच्यापासून जीविताला धोका असून पोलीस संरक्षण पूर्ववत करावे, अशी मागणी जरे व ॲड. पटेकर यांच्यावतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे. या मागणीबाबत गृहमंत्र्यांनाही कळविले असल्याचे ॲड. पटेकर यांनी सांगितले.