काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पोलिसांनी पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:23 AM2021-08-23T04:23:54+5:302021-08-23T04:23:54+5:30

कर्जत : स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ खुल्या बाजारात नेऊन तो चढ्या भावाने विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका व्यक्तीस कर्जत पोलिसांनी ...

Police seized ration rice going to the black market | काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पोलिसांनी पकडला

काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पोलिसांनी पकडला

कर्जत :

स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ खुल्या बाजारात नेऊन तो चढ्या भावाने विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका व्यक्तीस कर्जत पोलिसांनी जेरबंद केले. पोलिसांनी एका चारचाकी वाहनासह पाचशे किलो तांदूळ जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी (दि. २०) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

या प्रकरणी कर्जत तालुक्यातील देशमुखवाडी येथील अमोल जयसिंगकर यास पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी राशीन-कर्जत रस्त्यावर कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयासमोर सायंकाळी पाचच्या सुमारास चारचाकी वाहन (एम. एच. ४२ ए. क्यू. ६१५७) पकडले. या वाहनात तांदळाच्या प्रत्येकी ५० किलो वजनाच्या १० गोण्या आढळल्या. पोलिसांनी संबंधित तांदूळ, पाच लाख रुपयांचे चारचाकी वाहन असे जप्त केले. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल शाहूराजे टिकते यांनी फिर्याद दिली. आर्थिक फायद्यासाठी तांदळाची काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने गुन्हा केल्याच्या फिर्यादीवरून जीवनावश्यक वस्तू कायदा कलम १९५५ चे कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, पी. डी. अंधारे, पी. ए. हांचे, पोलीस नाईक दिंडे, आदींनी केली. तपास पोलीस नाईक पी. डी. अंधारे करीत आहेत.

----

असंख्य गोरगरीब कुटुंबांची उपजीविका रेशन धान्यावर चालते. मात्र, त्यांच्या तोंडातील घास काढून त्याची चढ्या भावात खुल्या बाजारात कुणी विक्री करीत असेल तर अशा दलालांची मुळीच गय केली जाणार नाही. असा प्रकार कुणाच्या निदर्शनास आल्यास नागरिकांनी तत्काळ कर्जत पोलिसांशी संपर्क साधावा.

-चंद्रशेखर यादव,

पोलीस निरीक्षक, कर्जत

Web Title: Police seized ration rice going to the black market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.