नेवासा तालुक्यात पाणीच पाणी चोहिकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 07:54 PM2020-04-16T19:54:06+5:302020-04-16T19:54:27+5:30
नेवासा (जि. अहमदनगर) : भंडारदरा व निळवंडे धरणातून अकोले,संगमनेर, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील बंधारे भरण्यासाठी १९०० दलघफु पाणी सोडविण्यात आले.प्रवरा नदीवरील शेवटचा बंधारा असलेल्या नेवाशाच्या मधमेश्वर बंधाºयात १५ दिवसांनी पाणी दाखल झाले त्यामुळे तालुक्यातील ४४ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा व काही प्रमाणात शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे
नेवासा (जि. अहमदनगर) : भंडारदरा व निळवंडे धरणातून अकोले,संगमनेर, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील बंधारे भरण्यासाठी १९०० दलघफु पाणी सोडविण्यात आले.प्रवरा नदीवरील शेवटचा बंधारा असलेल्या नेवाशाच्या मधमेश्वर बंधाºयात १५ दिवसांनी पाणी दाखल झाले त्यामुळे तालुक्यातील ४४ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा व काही प्रमाणात शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. प्रवरा नदीपात्रातील सर्व बंधारे भरून द्यावीत अशी आग्रही मागणी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व आमदार लहू कानडे यांनी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचेकडे केली होती.त्यानुसार जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचे आदेशाने दि.१ एप्रिल रोजी भंडारदरा व निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले.ते पाणी दि.१५ रोजी नेवासा येथील मध्यमेश्वर बंधाऱ्यात पाणी दाखल झाले. मध्यमेश्वर हा प्रवरा नदी पात्रातील शेवटचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे
भंडारदरा धरणातून प्रवरा कालव्यातून शेतीसाठीचे उन्हाळी आवर्तन दि.७ मार्च पासून सुरू होते.त्यातूनच दि.१ एप्रिल पासून प्रवरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याने भरण्यास सुरुवात झाली. कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरण्यासाठी सोडलेल्या पाण्यातून पाचेगाव,पुनतगाव, मध्यमेश्वर या नेवासा तालुक्यातील तीनही बंधारे भरणे चालू आहे.पाचेगाव -- १००.४०, पुनतगाव-- ८९ व मधमेश्वर बंधारा १६५ दशलक्ष घनफूट क्षमतेचे आहेत
मधमेश्वर बंधाºयायाच्या चार फळ्या पाण्यात पूर्णपणे भरले असल्याने गावकºयांमध्ये आनंद व्यक्त होतोय.यावर्षी मार्च सुरुवातीलाच पाणी आटून पाचवी कोरडे पडले या बंधाºयावर आजूबाजूची गावे पाणी पातळी अवलंबून आहे उन्हाचा तडाखा वाढल्यानंतर आजूबाजूचे गावातील पाण्याची पातळी कमी होऊ लागली होती त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण होते परंतु बंधारे भरल्यानंतर आता संभाव्य पाणीटंचाई वर मात झाली आहे पाणी पातळीत वाढ होऊन बोअर-विहिरींचे पाणी वाढण्यास मदत होऊन शेतात उभी असलेली पिके,जनावरांसाठीचे चारा पिके वाचतील तसेच माणसे व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे
नेवासा तालुक्यातील प्रवरा नदी पात्रातील बंधारे भरण्यासाठी पाणी सोडण्याकरीता सातत्याने पाठपुरावा केल्याने मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.