संगमनेरातून मुंबईकडे मांस घेऊन जाणारी तीन वाहने पोलिसांनी पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 07:57 PM2020-04-16T19:57:21+5:302020-04-16T19:57:30+5:30

संगमनेर : लॉकडाऊन काळात संगमनेरातून मुंबईकडे मांस घेऊन जाणारी तीन वाहने पोलिसांनी पकडली. ही कारवाई नाशिक  जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वावी पोलिसांनी केली. ९ ते १४ एप्रिल दरम्यान पकडलेल्या तीन वाहनांतून सुमारे दोन टन मांस जप्त करत वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने लॉकडाऊन काळातही संगमनेरात अवैध कत्तलखाने सुरू असल्याचे एकदा पुन्हा समोर आले आहे.

Police seized three vehicles carrying meat from Sangamnara to Mumbai | संगमनेरातून मुंबईकडे मांस घेऊन जाणारी तीन वाहने पोलिसांनी पकडली

संगमनेरातून मुंबईकडे मांस घेऊन जाणारी तीन वाहने पोलिसांनी पकडली

संगमनेर : लॉकडाऊन काळात संगमनेरातून मुंबईकडे मांस घेऊन जाणारी तीन वाहने पोलिसांनी पकडली. ही कारवाई नाशिक  जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वावी पोलिसांनी केली. ९ ते १४ एप्रिल दरम्यान पकडलेल्या तीन वाहनांतून सुमारे दोन टन मांस जप्त करत वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने लॉकडाऊन काळातही संगमनेरात अवैध कत्तलखाने सुरू असल्याचे एकदा पुन्हा समोर आले आहे.
  अहमदनगर-नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे शिवारातील संगमनेर-सिन्नर रस्ता, निमोण-तळेगाव रस्ता येथे कारवाई करण्यात आली. ९ एर्प्रिल ला संध्याकाळी सातच्या सुमारास अझरूद्दीन जमालुद्दीन शेख (वय २७), अहसान मोहम्मद कुरेशी (वय २२) (दोघेही रा. कुर्ला पुर्व, कुरेशी नगर, सारा रहिवासी सेवा संघ, खोली नंबर १२२, मुंबई) हे आयशर टेम्पोतुन (एम. एच. ०३, सी. व्ही. ४६४४) मुंबईकडे मांस घेऊन चालले होते. हा टेम्पो पोलिसांनी पकडत त्यातील पाच लाख ४८ हजार रुपए किंमतीचे ५ हजार ४८० किलो मांस व तीन लाख ५० हजार रूपयांचा टेम्पो असा एकुण आठ लाख ९८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अभय मुरलीधर ढाकणे यांनी फिर्याद दिली आहे.
     १३ एप्रिल ला रात्री पावणे अकराच्या सुमारास मोहमद युनुस याकुब कुरेशी (वय ४२), महेशकुमार जयदेवप्रसाद शर्मा (वय २६) (दोघेही रा. कुरेशी नगर, मोहमद चाळ, कसाईवाडा, कुर्ला, मुंबई) हे टाटा मालट्रकमधून (एम. एच. ०३, सी. व्ही. ४७४९) मुंबईकडे मांस घेऊन जात होते. पोलिसांनी त्यांना पकडत मालट्रक मधील दहा लाख रुपए किंमतीचे दहा हजार किलो मांस व दहा लाखांचा टेम्पो असा एकुण वीस लाख रुपए किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस शिपाई विठ्ठल रामनाथ पवार यांनी फिर्याद दिली आहे.
     १४ एप्रिल ला रात्री सव्वा नऊच्या सुमारास इक्बाल अब्दुल रहमान खान (वय २९, रा. इंदिरानगर, बरमासेल रेल्वे लाईन, कसाईवाडा, कुरेशी नगर, कुर्ला पुर्व, मुंबई) अहेसान मोहमद कुरेशी (वय २२, मुुळ रा. गौंडा वस्ती, उत्तरप्रदेश, हल्ली रा. कुरेशीनगर मोहमद चाळ, कसाईवाडा, कुर्ला, मुंबई) हे दोघे आयशर टेम्पोतून ( एम. एच. ४८, ए. जी. ६७२६) मुंबईकडे मांस घेऊन जात असताना त्यांना पोलिसांनी पकडले. त्यातील पाच लाख रुपए किंमतीचे पाच हजार किलो मांस व चार लाख ५० हजार रुपए किंमतीचा टेम्पो असा एकुण नऊ लाख ५० हजार रुपए किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस शिपाई सुधाकर शंकर चव्हाणके यांनी फिर्याद दिली आहे.
---
 भाजीपाल्या खाली लपवले मांस
    संगमनेरातील अवैध कत्तलखान्यांमध्ये जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस मोठ्या प्रमाणात या तीन वाहनांतून मुंबईकडे नेण्यात येत होत. कुठलाही संशय येवू नये म्हणून वाहनांमध्ये भाजीपाल्याच्या खाली लपवून हे मांस नेले जात होते. वावी पोलीस ठाण्याचे सहायक  पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत वावी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जप्त केलेले मांस हे गोवशांचे आहे का? याचा तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Police seized three vehicles carrying meat from Sangamnara to Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.