त्रास देणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी कारवाई करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:15 AM2021-06-11T04:15:34+5:302021-06-11T04:15:34+5:30
अहमदनगर : विनाकारण त्रास देणाऱ्या आरोपींविरोधात पोलिसात दोनदा तक्रार दाखल करूनही पोलिसांकडून आरोपींवर कारवाई होत नाही. त्यामुळे हे आरोपी ...
अहमदनगर : विनाकारण त्रास देणाऱ्या आरोपींविरोधात पोलिसात दोनदा तक्रार दाखल करूनही पोलिसांकडून आरोपींवर कारवाई होत नाही. त्यामुळे हे आरोपी आणखी त्रास देत असल्याची तक्रार बोल्हेगाव येथील दिव्यांग महिलेने पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
याबाबत सरला नामदेव मोहोळकर (वय ३५, रा. गांधीनगर, बोल्हेगाव) यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी अपंग असून पती व दोन मुलींसोबत बोल्हेगाव येथे राहते. माझे पती व त्यांच्या भाऊबंदामध्ये वडिलोपार्जित मिळकतीवरून वाद आहे. त्याबाबत पतीने न्यायालयात दावा दाखल केला असून त्याचा रा. मनात धरत छाया वामन मोहळकर, संतोष बाबासाहेब मोहोळकर, सोनाली बनकर, अक्षय वामन मोहोळकर यांनी आपणास व पती यांना बेदम मारहाण केली. याबाबत १६ जानेवारी व २१ मे असे दोनदा तोफखाना पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरोधात तक्रार दाखल केली, परंतु पोलिसांनी अद्याप कारवाई केलेली नाही. त्यामुळे या आरोपींपासून आमच्या जीवितास धोका आहे. तरी आरोपींविरोधात दि राईटस ॲाफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज ॲक्ट २०१६ प्रमाणे कारवाई करावी.