कोपरगावात विनाकारण रस्त्यावर फिरणा-यांना पोलिसांंनी चोपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 10:30 PM2020-03-23T22:30:53+5:302020-03-23T22:32:10+5:30
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली आहे. रविवारी जनता कर्फ्यूला जोरदार प्रतिसाद मिळाला. परंतु सोमवारी मात्र नागरिक रस्त्यावर फिरताना आढळून आले. यावेळी कोपरगाव शहरात विनाकारण दुचाकीवरून फिरणा-यांना पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर व पोलिसांंनी चोप दिला.
कोपरगाव : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली आहे. रविवारी जनता कर्फ्यूला जोरदार प्रतिसाद मिळाला. परंतु सोमवारी मात्र नागरिक रस्त्यावर फिरताना आढळून आले. यावेळी कोपरगाव शहरात विनाकारण दुचाकीवरून फिरणा-यांना पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर व पोलिसांंनी चोप दिला.
कोपरगाव तहसीलदार योगेश चंद्रे यांनी संपूर्ण शहरात फिरून स्वत: लाऊड स्पीकर्समधून नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले. तसेच गर्दी करणा-यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी सक्त ताकीद दिली.
दरम्यान सोमवारी नागरिकांनी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केली होती. दुपारनंतर पोलिसांंनी अनेकांना ताकीद दिली. तर काही टवाळखोर फिरताना आढळून आल्याने त्यांना चोप दिला. यानंतर मात्र रस्त्यावरील गर्दी कमी झाली. पोलिसांंनी नागरिकांंनी गर्दी करु नये, असे आवाहन केले आहे.