११ वर्षाच्या मुलीचा विवाह पोलिसांनी रोखला; पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 10:52 AM2020-06-08T10:52:36+5:302020-06-08T10:53:12+5:30
पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील एका २५ वर्षाच्या मुलाशी अवघ्या ११ वर्षे वयाच्या मुलीचा बालविवाह लावण्यात येत होता. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करीेत हा बालविवाह रोखला. या प्रकरणी रविवारी रात्री उशीरा पाथर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मढी : पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील एका २५ वर्षाच्या मुलाशी अवघ्या ११ वर्षे वयाच्या मुलीचा बालविवाह लावण्यात येत होता. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करीेत हा बालविवाह रोखला. या प्रकरणी रविवारी रात्री उशीरा पाथर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शेवगाव तालुक्यातील हसनापूर येथील नवरदेव आहे. तो २५ वर्षे वयाचा आहे. तर मुलगी शिरापूर (ता.पाथर्डी) येथील आहे. मुलीचे वय अवघे ११ वर्षाचे आहे. सदर मुलीचा साखरपुडा (दि.६ जून) रोजी शिरापूर येथे मुलीच्या आत्याच्या घरी झाला होता. सदर मुलगी ही खुंटफळ येथील जिल्हा परिषद शाळेत शिकत आहे. मुलीचे आई, वडील ऊस तोडणी कामगार आहेत.
या बालविवाहाची माहिती पोलिसांना समजताच रविवारी पोलीस विवाहस्थळी दाखल झाले. वधू-वरांकडील दोन्ही नातेवाईकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या सर्वांना रात्री पोलीस ठाण्यात आणले. रविवारी रात्री उशीरा याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.