नगर-औरंगाबाद महामार्गावर भरधाव टँकरने पोलीस कर्मचाऱ्याला उडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 14:38 IST2020-04-23T14:38:15+5:302020-04-23T14:38:59+5:30
गुरुवारी (दि.२४) पहाटे बंदोबस्ताला तैनात असलेल्या पोलीस कर्मचा-याला भरधाव टँकरने उडविले. या अपघातात वाहतूक शाखेतील कॉन्स्टेबल नदीम शफी शेख (वय ३४) यांच्या डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.

नगर-औरंगाबाद महामार्गावर भरधाव टँकरने पोलीस कर्मचाऱ्याला उडविले
अहमदनगर : नगर-औरंगाबाद महामार्गावरील शेंडी बायपास येथे गुरुवारी (दि.२४) पहाटे बंदोबस्ताला तैनात असलेल्या पोलीस कर्मचा-याला भरधाव टँकरने उडविले. या अपघातात वाहतूक शाखेतील कॉन्स्टेबल नदीम शफी शेख (वय ३४) यांच्या डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.
बायपास येथे वाहने सोडण्यासाठी बॅरिकेट लावण्यात आले आहेत़ त्या ठिकाणी पोलीस मुख्यालयातील कर्मचारी नेमण्यात आले आहेत. गुरुवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एक टँकर भरधाव आला. औरंगाबादच्या दिशेने आलेला हा टँकर बायपासने एमआयडीसीकडे जात असताना टँकरने बॅरिकेट उडवून दिले. याचवेळी रस्त्याच्याकडेला उभा असलेल्या शेख यांना वाहनाची धडक बसून ते गंभीर जखमी झाले. तर काही अंतरावर जाऊन टँकरही उलटला. यावेळी टँकर चालक फरार झाला. या घटनेनंतर इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी शेख यांना नगरमधील खासगी हास्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. या अपघाताची एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे तसेच पोलिसांनी फरार झालेल्या टँकर चालकाचा शोध सुरू केला आहे.