राजकीय पेरणी: कोरोनातही भाजप -राष्ट्रवादीने साधली लोक संपर्काची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 01:08 PM2020-06-16T13:08:29+5:302020-06-16T13:08:48+5:30

अहमदनगर : कोरोना लॉकडाऊनच्या काळात राजकीय पक्षांनी लोक संपर्काची संधी शोधली आहे़  भाजप व राष्ट्रवादीने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लावले असून, नगर जिल्ह्यात दोन्ही पक्षांनी साखर पेरणी सुरू केली आहे़  त्यामुळे कोरोनाच्या महामारीतही जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे़  

Political sowing: BJP-NCP also gets opportunity for public relations in Corona | राजकीय पेरणी: कोरोनातही भाजप -राष्ट्रवादीने साधली लोक संपर्काची संधी

राजकीय पेरणी: कोरोनातही भाजप -राष्ट्रवादीने साधली लोक संपर्काची संधी

अण्णा नवथर


अहमदनगर : कोरोना लॉकडाऊनच्या काळात राजकीय पक्षांनी लोक संपर्काची संधी शोधली आहे़  भाजप व राष्ट्रवादीने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लावले असून, नगर जिल्ह्यात दोन्ही पक्षांनी साखर पेरणी सुरू केली आहे़  त्यामुळे कोरोनाच्या महामारीतही जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे़  

भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्र १ कोटी घरात पोहोचविण्याचे उदिष्ट ठेवले असून, नगर जिल्ह्यातील खासदार, आजी-माजी आमदार, पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यामार्फत घरोघरी जाऊन पत्राचे वाटप केले जात आहे़  राष्ट्रवादीने अभियप्राय मागविण्याची मोहीम जिल्ह्यात हाती घेतली आहे़  राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी बुथ स्तरावरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अभियप्राय नोंदविण्याचे आवाहन केले आहे़ राष्ट्रवादीचे हे अभियान २५ जून पर्यंत सुरू राहणार आहे़.

 या काळात राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आॅनलाईन अभिप्राय नोंदवायचा आहे़  ही मोहीम हाती घेऊन राष्ट्रवादीने जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याचा प्रयत्न चालविला आहे़  भाजपने तर कार्यकर्त्यांना उदिष्ट दिले असून, त्याचा दररोज आढावा घेतला जात आहे़  त्यामुळे भाजपचे जिल्ह्यातील आमदार, खासदार, माजी आमदार, महापौर, नगराध्यक्ष नगरसेवक कामाला लागले आहेत़

कोरोना आणि त्यापाठोपाठ सुरू झालेल्या पावसामुळे जिल्ह्यासमोर अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत़ शेतकºयांना वेळेवर कर्ज मिळत नाही़  कोरोनाच्या उपाययोजनांसाठी सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील इतर प्रश्न तुंबले आहेत़  या प्रश्नावर अवाज उठविण्याचे काम विरोधकांचे आहे़ परंतु, विरोधी भाजपही संपर्क करण्यात व्यस्त असून, जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे़  राजकीय पक्षांचे हे संपर्क अभियान सध्या राजकीय वतुर्ळातील चचेर्चा विषय ठरला आहे़

Web Title: Political sowing: BJP-NCP also gets opportunity for public relations in Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.