अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईत राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:18 AM2021-04-26T04:18:34+5:302021-04-26T04:18:34+5:30
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोप प्रकरणी सीबीआयने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल ...
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोप प्रकरणी सीबीआयने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत महसूलमंत्री थोरात यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून संगमनेरातील विघ्नहर्ता पॅलेस येथे पाचशे बेडचे कोविड-केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. रविवारी (दि. २५) या सेंटरला महसूलमंत्री थोरात यांनी भेट दिली.
थोरात म्हणाले, नागरिकांना मोफत लस द्यावी, असा आग्रह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा आहे. हा आग्रह राज्य शासनामध्ये काँग्रेसने धरला आहे. शेवटी त्यावर चर्चा होऊन त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्णय घेतील. कोरोनाचे संकट मोठे आहे. सगळीकडे ऑक्सिजन पुरविणे खूप कठीण बाब झाली आहे. ही वस्तुस्थिती आहे. दिल्लीमध्येसुद्धा इतकी मोठी घटना त्यामुळे घडली आहे. रुग्णांच्या प्रमाणात सगळीकडे ऑक्सिजनचा पुरवठा झाला पाहिजे. परंतु त्यावर एकमेव चांगला उपाय हा निर्बंध पाळणे व लक्षणे असतील अशा नागरिकांना कोविड सेंटरला आणणे आणि त्यातूनसुद्धा त्यांना चांगला उपचार देणे आणि ऑक्सिजनची वेळ येईल इथपर्यंत पोहचू न देणे हा देखील आहे. कोरोनाबाधित रुग्णांना लवकर उपचार मिळाले असता ते लवकर बरे होतात. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत.
--------------------
कोरोनाची लागण झालेल्या संगमनेर तालुक्यातील रुग्णांसाठी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून कोविड-केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. प्राथमिक काळजी घेतल्यानंतर कोरोनाचे रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. तालुक्यात सर्वेक्षण करण्यात येत असून शहरातही ते सुरू आहे. कोरोनाचे थोडेही लक्षण जाणवू लागल्यास नागरिकांना कोविड-केअर सेंटरला पाठविण्यात येते. याचा परिणाम चांगला दिसून येत असून शनिवारी संगमनेर शहरात केवळ १७ बाधित रुग्ण आढळले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश येते आहे.
- बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री