पोलखोल रथ झाला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:15 AM2021-01-10T04:15:27+5:302021-01-10T04:15:27+5:30

संयुक्त किसान मोर्चाचे राज्य समनवयक संदीप गिठ्ठे यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, मुलांना न्याय देण्यासाठी या लढ्यात उतरणे ...

The Polkhol chariot departed | पोलखोल रथ झाला रवाना

पोलखोल रथ झाला रवाना

संयुक्त किसान मोर्चाचे राज्य समनवयक संदीप गिठ्ठे यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, मुलांना न्याय देण्यासाठी या लढ्यात उतरणे गरजेचे आहे. देशभर शेतकऱ्यांचा आक्रोश चालू असताना महाराष्ट्र शांत कसा? आज संयुक्त किसान एमएसपीच्या कायद्याने महाराष्ट्र, पंजाब येथील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. पुणतांबा या गावाने आम्हाला ओळख दिल्याने या यात्रेची सुरुवात येथून करण्यात आली आहे. रोज या कायद्याची पोलखोल करत जाणार आहोत. पोलखोल यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून नांदेड येथे श्री गुरुगोविंदसिंघजी यांच्या जयंतीनिमित्त २० जानेवारीला समारोप होणार आहे.

तेथे किसान मोर्चाचे कक्काजी, योगेंद्र यादव शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

पुणतांबा येथील किसान क्रांतीचे राज्य समन्वयक धनंजय जाधव, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुहास वहाडणे, राहाता तालुका उपप्रमुख भास्कर मोटकर, संदीप गिठ्ठे, शंकर दरेकर, अरुण कान्होरे, निकिता जाधव, गणेश बनकर, लक्ष्मण वणगे उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश बनकर यांनी तर प्रास्तविक शंकर दरेकर यांनी केले. चंद्रकांत वाटेकर यांनी आभार मानले. कृषीकन्या निकिता जाधव हिच्या हस्ते यात्रेला झेंडा दाखविण्यात आला.

Web Title: The Polkhol chariot departed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.