पुणतांब्यातून निघाली किसान क्रांती मोर्चाची पोलखोल यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 03:07 PM2021-01-09T15:07:14+5:302021-01-09T15:08:03+5:30
केंद्र सरकारने आणलेल्या तीन शेतकरी विरोधी कायद्याची पोलखोल करण्यासाठी पुणतांबा येथील किसान क्रांती मैदानातून किसान क्रांती मोर्चाची पोलखोल यात्रा शनिवारी दुपारी निघाली. रथाला झेंडा दाखवून आज यात्रेचा शुभारंभ झाला.
पुणतांबा : केंद्र सरकारने आणलेल्या तीन शेतकरी विरोधी कायद्याची पोलखोल करण्यासाठी पुणतांबा येथील किसान क्रांती मैदानातून किसान क्रांती मोर्चाची पोलखोल यात्रा शनिवारी दुपारी निघाली. रथाला झेंडा दाखवून आज यात्रेचा शुभारंभ झाला.
यावेळी संयुक्त किसान मोर्चाचे राज्य समनवयक संदीप गिठ्ठे म्हणाले की, मुलांना न्याय देण्यासाठी या लढ्यात उतरणे गरजेचे आहे. देशभर शेतकऱ्याचा आक्रोश चालू असताना महाराष्ट्र शांत कसा? असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे आज संयुक्त किसान एमएसपीचा कायद्याने महाराष्ट्र, पंजाब, शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. पुणतांबा या गावाने आम्हाला ओळख दिल्याने या यात्रेची सुरवात येथून केली आहे. रोज या कायद्याची पोलखोल करत यात्रा जाणार आहे. आजपासून सुरू झालेल्या पोलखोल यात्रेचा नांदेड येथे गुरुगोविंदसिंग यांच्या जयंतीनिमित्त २० जानेवारीला समारोप होणार आहे. त्यावेळी किसान मोर्चाचे कक्काजी, योगेंद्र यादव उपस्तीत राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे.
पुणतांबा येथील किसान क्रांतीचे राज्य समनवयक धनंजय जाधव, शिवसेना जेष्ठ नेते सुहास वहाडणे, राहाता तालुका उपप्रमुख भास्कर मोटकर, संदीप गिठ्ठे, शंकर दरेकर, अरुण कान्होरे, कृषी कन्या निकिता जाधव, गणेश बनकर, लक्ष्मण वणगे उपस्तीत होते.
सूत्रसंचालन गणेश बनकर यांनी केले. प्रास्ताविक शंकर दरेकर यांनी केले. आभार चंद्रकांत वाटेकर यांनी मानले. तर कृषी कन्या निकिता जाधव हस्ते या यात्रेला झेंडा दाखवण्यात आला.