शेवगाव तालुक्यातील ६ ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 06:27 PM2019-02-23T18:27:01+5:302019-02-23T18:27:11+5:30
तालुक्यातील ६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती तहसीलदारांनी दिली.
शेवगाव : तालुक्यातील ६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती तहसीलदारांनी दिली.
६ गावच्या सरपंच पदासाठी १४ तर ग्रामपंचायत सदस्यांच्या १७ प्रभागातील ३५ जागांसाठी ७२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सरपंच पदासाठी सालवडगावमध्ये ४, मंगरूळ खु., मंगरूळ बु, जुनी खामपिंपरी, नवीन खामपिंपरी, माळेगावने या ग्रामपंचायतमध्ये प्रत्येकी २ उमेदवार रिंगणात आहेत. सालवडगाव ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाच्या प्रभाग क्रमांक- १ मधील सर्व साधारण विभागातून अरुण त्रिंबक निकते, सर्व साधारण महिला विभागातून अनिता काकासाहेब टेकाळे, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला विभागातून सविता कानिफनाथ भापकर, मंगरूळ बु ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र.३ मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग विभागातून रमेश भगवान झिरपे, सर्व साधारण महिला विभागातून छाया अंकुश झिरपे व आशा भगवान केदार, जुनी खामपिंपरी प्रभाग क्र.२ मधून सर्व साधारण विभागातून मीना भुजंग पावसे, प्रभाग क्र. ३ नागरिकांचा मागास प्रवर्ग विभागातून मनोज किसान दसपुते व अनुसूचित जमाती विभागातून साधना सुरेश केंदळे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे.