महापालिकेच्या ६८ जागांसाठी उद्या मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 05:15 PM2018-12-08T17:15:09+5:302018-12-08T17:15:12+5:30
महापालिकेच्या १७ प्रभागातील ६८ जागांसाठी ३३९ उमेदवार रिंगणात आहेत. जाहीर प्रचार संपल्यानंतर आता वैयक्तिक प्रचारावर उमेदवारांनी भर दिला आहे
महापालिकेच्या १७ प्रभागातील ६८ जागांसाठी ३३९ उमेदवार रिंगणात आहेत. जाहीर प्रचार संपल्यानंतर आता वैयक्तिक प्रचारावर उमेदवारांनी भर दिला आहे. महापालिकेसाठी रविवारी (दि. ९) मतदान होत आहे. निवडणुकीच्या आखाड्यात शिवसेना,भाजप आणि राष्ट्रवादी असे प्रमुख तीन पक्ष उतरले आहेत. याशिवाय १०६ अपक्षांचे राजकीय पक्षांच्या उमेदवारांसमोर आव्हान असणार
आहे.
महापालिका निवडणूक प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यावर आली आहे. रविवारी (दि. ९)मतदान, तर सोमवारी (दि. १०) मतमोजणी होणार आहे. राजकीय पक्षांच्या प्रचाराची शुक्रवारी सायंकाळी सांगता झाली. त्यानंतर आता उमेदवारांच्या मतदारांशी वैयक्तिक गाठी-भेटी सुरू झाल्या आहेत. बहुतांशी प्रभागात तिरंगी, तर काही भागात चौरंगी लढती आहेत. जुन्या शहरात शिवसेना व भाजप यांच्यात तर उपनगरात शिवसेना-राष्ट्रवादी, भाजपा-राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. प्रत्येक जण आपापले अंदाज लावण्यात गर्क झाले आहेत. कोणाच्या किती जागा येणार?यावर शहरात चर्चा सुरू आहे.