१५ आॅगस्टपासून कोपरगाव बाजार समितीत डाळिंब लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 04:37 PM2018-08-10T16:37:53+5:302018-08-10T16:37:59+5:30
कोपरगाव बाजार समितीने १५ आॅगस्टपासून डाळिंब मार्केट सुरू होणार आहे. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ होत असल्याची माहिती अध्यक्ष संभाजीराव रक्ताटे यांनी दिली.
कोपरगाव : कोपरगाव बाजार समितीने १५ आॅगस्टपासून डाळिंब मार्केट सुरू होणार आहे. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ होत असल्याची माहिती अध्यक्ष संभाजीराव रक्ताटे यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी आमदार अशोक काळे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, युवा नेते आशुतोष काळे, सभापती अनुसया होन, जि.प.सदस्य राजेश परजणे, नितीन औताडे, राजेंद्र जाधव आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. डाळिंब मार्केट आठवड्यातील सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सुरू राहिल. तेंव्हा जास्तीत जास्त डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी आपला माल कोपरगाव बाजार समितीत विक्रीसाठी आणावा. या कार्यक्रमांसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन उपसभापती राजेंद्र निकोले, सचिव परशराम सिनगर व बाजार समितीच्या सर्व संचालकांनी केले आहे.