केडगाव येथे महापुरुषांच्या पुतळ्यांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:21 AM2021-05-26T04:21:50+5:302021-05-26T04:21:50+5:30
केडगावमधील महात्मा फुले , यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यांची दुरवस्था केडगाव : केडगाव येथील महात्मा फुले व यशवंतराव चव्हाण यांच्या ...
केडगावमधील महात्मा फुले , यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यांची दुरवस्था
केडगाव : केडगाव येथील महात्मा फुले व यशवंतराव चव्हाण यांच्या अर्धाकृती पुतळ्यांची दुरवस्था झाली असून महापालिकेच्या दुर्लक्षामुळे येथील सुशोभीकरणाची ही मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली आहे.
केडगाव येथील नगर-पुणे मार्गालगत अंबिकानगर बसथांब्याजवळ वीस वर्षांपूर्वी छोटेखानी उद्यान तयार करून तेथे महात्मा जाेतिबा फुले व राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा अर्धाकृती पुतळे शेजारी -शेजारी बसवण्यात आले. येथे रंगीबेरंगी फुलांचे झाडे, कारंजे ही उभारण्यात आले होते तसेच सुशोभीकरण करताना येथे महागड्या फरशी बसवण्यात आल्या होत्या. सध्या मात्र या सर्वांचीच दुरवस्था सुरू आहे. येथील कारंजी बंद पडली आहे, कठड्यांची व मुख्य प्रवेशद्वाराची दुरवस्था झाली आहे. जोराच्या वादळात पुतळे हलतात . यामुळे या परिसराचे पुन्हा नव्याने सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी केडगाव राष्ट्रवादीचे अध्यक्ष भरत गारूडकर यांनी केली आहे. येथील बागेची निगा राखण्यासाठी महापालिकेने दोन कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी नियुक्ती करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
---------------------
केडगाव मधील महात्मा फुले व यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याची व तेथील बागेची दुरवस्था झाली असून येथे नव्याने सुशोभीकरण करण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे मागणी करण्यात येणार आहे.
-भरत गारूडकर, अध्यक्ष केडगाव राष्ट्रवादी काँग्रेस
फोटो- २५ केडगाव