मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त
By Admin | Published: December 23, 2015 11:22 PM2015-12-23T23:22:02+5:302015-12-23T23:25:45+5:30
अहमदनगर : विधान परिषदेच्या नगर स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी मतदारसंघातील निवडणूक निर्भय वातावरणात घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयुक्तांनी बुधवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले
अहमदनगर : विधान परिषदेच्या नगर स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी मतदारसंघातील निवडणूक निर्भय वातावरणात घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयुक्तांनी बुधवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत़ गैरवापर केल्यास कडक पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत़
राज्य निवडणूक आयुक्त ांच्या वतीने सचिव नितीन गद्रे यांनी दुपारी राज्यातील विधान परिषद निवडणुकीचा व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे आढावा घेतला़ निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कवडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र पाटील, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण आनंदकर यावेळी उपस्थित होते़ विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदारांची संख्या मर्यादित आहे़ मतदार संख्या कमी असल्याने निवडणुकीत गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ त्यामुळे मतदान केंद्रावरील घडामोडीचे व्हिडीओ चित्रीकरण करण्याच्या सूचना यावेळी गद्रे यांनी केल्या आहेत़ शहरासह जिल्ह्यातील १६ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येत आहे़ ही सर्व मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत़ मतदान केंद्राभोवती कडेकोट बंदोबस्तही तैनात करण्यात येणार असून, मतदानाच्या दोन दिवस आधीच मतदान केंद्रांवर साहित्य पोहोच केले जाईल. (प्रतिनिधी)
मतदान केंद्रावरील सुरक्षा वाढविण्याची गाडेंची मागणी
शहरासह जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर तपासणी घेऊनच मतदारांना प्रवेश देण्यात यावा़ तसेच मतपत्रिका व्यवस्थित पेटीत टाकली किंवा नाही, यावर प्रशासनाने लक्ष ठेवावे़ मतदार प्रतिनिधींना केंद्रात प्रवेश देऊ नये, त्यांची व्यवस्था मतदान केंद्राबाहेर करावी़ याशिवाय ५० टक्के महिला मतदार आहेत़ त्यामुळे केंद्रांवर महिला पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी़ महिलांच्या सुरक्षेची मागणी सेनेचे उमेदवार शशिकांत गाडे यांनी बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कवडे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे़