केंद्रीय वने, पर्यावरण समितीवर पोपटराव पवार यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 02:31 PM2021-03-02T14:31:45+5:302021-03-02T14:32:43+5:30
भारत सरकारच्या वने व पर्यावरण समितीची पुनर्रचना करण्यात आली असून सदर समितीवर आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड झाली आहे.
अहमदनगर : भारत सरकारच्या वने व पर्यावरण समितीची पुनर्रचना करण्यात आली असून सदर समितीवर आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड झाली आहे.
वनमंत्री हे या समितीचे अध्यक्ष असून त्यात सामाजिक,पर्यावरण,उद्योग तसेच इतर क्षेत्रातील मिळून ११ सदस्यांची समिती आहे. सदर समितीमार्फत पडजमीनी वनाच्छादीत करणे, जंगलतोड थांबविणे, पर्यांवरण संतुलनाच्या दृष्टीने शहरी व ग्रामीण भागात हरितपट्टे निर्माण करणे हे प्रमुख उद्दिष्टे आहेत.
यात शाळा, महाविद्यालये,उद्योगक्षेत्र, आजी, माजी सैनिक संघटना, खाजगी स्वयंसेवी संस्था या सर्वांच्या सहकार्यातून वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन व जनजागृती यावर काम केले जाणार आहे. केंद्रीय वने व पर्यावरण मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे.