पोपटराव पवार यांनाच हिवरेबाजारचा कौल, विरोधकांच्या अनामती जप्त; ३५ वर्षांनंतर झाली निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 06:36 AM2021-01-19T06:36:21+5:302021-01-19T06:38:27+5:30

गावात सुमारे ९२ टक्के विक्रमी मतदान झाले. मतदारांनी उत्स्फूर्तपणे केलेले मतदान पवार यांच्या फायद्याचे ठरले. गावात एकूण ७ जागा होत्या. त्या सर्व जागा पवार यांनी मोठ्या फरकाने जिंकल्या. पवार यांना २८२ तर त्यांचे विरोधी किशोर सुंबळे यांना फक्त ४४ मते पडली.

Popatrao Pawar in Hivrebazar Elections were held after 35 years | पोपटराव पवार यांनाच हिवरेबाजारचा कौल, विरोधकांच्या अनामती जप्त; ३५ वर्षांनंतर झाली निवडणूक

पोपटराव पवार यांनाच हिवरेबाजारचा कौल, विरोधकांच्या अनामती जप्त; ३५ वर्षांनंतर झाली निवडणूक

केडगाव : आदर्शगाव हिवरेबाजार येथे ३५ वर्षांनंतर झालेल्या निवडणुकीत गावकऱ्यांनी एकमताने पोपटराव पवार यांच्या बाजूने स्पष्ट कौल देऊन गावाची सत्ता पुन्हा त्यांच्याच ताब्यात दिली आहे. विरोधी आघाडीला अनामत रकमाही वाचवण्यात यश मिळाले नाही. 

गावात सुमारे ९२ टक्के विक्रमी मतदान झाले. मतदारांनी उत्स्फूर्तपणे केलेले मतदान पवार यांच्या फायद्याचे ठरले. गावात एकूण ७ जागा होत्या. त्या सर्व जागा पवार यांनी मोठ्या फरकाने जिंकल्या. पवार यांना २८२ तर त्यांचे विरोधी किशोर सुंबळे यांना फक्त ४४ मते पडली.

या निवडणुकीचा अनुभव खूप काही शिकवून गेला. आता मी मोकळा झालो. कारण, गाव सांभाळणारी तरुणांची पिढी या निवडणुकीने गावात तयार झाली. आता गावात कोणतीच राजकीय धुसफूस असणार नाही. पैशांच्या जोरावर जर निवडणुका जिंकून कोणी सत्तेत येत असेल व गावासाठी खस्ता खाणारे बाजूला होत असतील, तर निवडणूक प्रक्रिया बदलण्याची गरज निर्माण झाली आहे.
- पोपटराव पवार, 
हिवरेबाजार, अहमदनगर

राळेगणसिद्धीत अण्णा समर्थक पॅनलचीच सत्ता -

- पारनेर (जि. अहमदनगर) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी ग्रामपंचायतीमध्ये नऊ जागांवर ग्रामविकास पॅनलने सत्ता काबीज केली. साड्या वाटप करून प्रलोभने देणाऱ्या श्यामबाबा पॅनलच्या उमेदवारांना मतदारांनी साफ नाकारले. 

- माजी सरपंच जयसिंग मापारी, माजी उपसरपंच लाभेष औटी, अण्णा हजारे यांचे माजी स्वीय सहायक सुरेश पठारे व दत्ता आवारी यांनी पॅनलची मोट बांधली.   

- नेहमीप्रमाणे गावात निवडणूक बिनविरोध करायचे ठरले होते. त्यासाठी आमदार नीलेश लंके यांनीही पुढाकार घेतला. पहिल्या बैठकीत निवडणूक बिनविरोध करण्याला संमतीही झाली होती. मात्र, नंतर बिनसले. 

Web Title: Popatrao Pawar in Hivrebazar Elections were held after 35 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.